रत्नागिरी ः जुलैपासून एकच प्लास्टिकच्या वापरावर बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः जुलैपासून एकच प्लास्टिकच्या वापरावर बंदी
रत्नागिरी ः जुलैपासून एकच प्लास्टिकच्या वापरावर बंदी

रत्नागिरी ः जुलैपासून एकच प्लास्टिकच्या वापरावर बंदी

sakal_logo
By

एकल प्लास्टिक वापरावर बंदीः लोगो

24875ः संग्रहीत
....
एकल प्लास्टिक वस्तू वापराल तर दोषी ठराल!

जुलैपासून अमलबजावणी होणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः एकल वापर प्लास्टिकच्या वापरातून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. यात विशेषत: सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व थर्माकोल, मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटावर आवरणासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, कान कोरण्यास वापरायच्या प्लास्टिक काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कॅन्डी, आईस्क्रीम कांड्या, प्लास्टिक प्लेटस, कप ग्लासेस व इतर साहित्यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंवर १ जुलै २०२२ पासून बंदी घातली आहे. याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेस जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे काल (ता. २६) एकल प्लास्टिक वापराबाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे प्रादेशिक अधिकारी, मुख्यालय प्लास्टिक सेल नंदकुमार गुरव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राक्षे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूणचे उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी, क्षेत्रीय अधिकारी अमित लाटे तसेच सर्व पालिका, नगर पंचायतींचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ते म्हणाले, एकल वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या विविध वस्तूंऐवजी निसर्गपूरक इतर अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने कापडी पिशव्या, बांबू, लाकडी वस्तू, सिरॅमिक्सचे प्लेट, वाट्या आदी चांगले पर्याय आहेत. नागरिकांनी अशा निर्सगपूरक वस्तूंचा वापर अधिकाधिक करावा. प्लास्टिकच्या वस्तूपासून पर्यावरणाला अधिक धोका निर्माण होऊ नये, या दृष्टीने यावर पुर्नप्रक्रिया करण्यावर अधिक भर द्यावा. महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार ५०० रूपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रूपयांपर्यंत दंड आकारणार आहे. दुसऱ्यांदा याचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास १० हजार रूपये दंड आकारला जाईल. तिसऱ्यांदा कोणी धाडस केले तर त्यांच्याविरुद्ध २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्याचा कारावास असेल.
..
ग्राफ करावा
एक नजर...
संस्थात्मक पातळीवर दंड ः ५ हजारापर्यंत
दुसऱ्यांदा याचा वापर केल्यास दंडः १० हजार
तिसऱ्यांदा वापराचे धाडस केल्यास दंडः २५ हजार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62227 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top