
रत्नागिरी-‘प्रथमा’ पुन्हा वेळासला येऊन दक्षिणेकडे
पा २ फ्लायर
...
फोटो काल सोडला
...
फोटो काल सोडला
-rat27p26.jpg
24843
- रत्नागिरी ः कासवांचा प्रवास दाखविणारा नकाशा.
--------------
‘प्रथमा’ दक्षिणेकडे चालली; ‘सावनी’ सह ‘रेवा’ उत्तरेकडचे सहप्रवाशी
संशोधकांचे निरीक्षण; ‘सॅटेलाइट टॅगिंग’ केलेल्या कासवांचा आठवड्यातील प्रवास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः गुजरातच्या सागरी हद्दीत विहार करणाऱ्या ‘प्रथमा’ कासवाचा महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास सुरू झाला होता आणि त्यानंतर ‘प्रथमा’ वेळास समुद्रकिनारी परतली होती. मात्र, आता ती आणखी दक्षिणेकडे गेली असून वेंगुर्ले येथील वायंगणी समुद्रकिनारी दिसून येत आहे. ‘सावनी’ आणि ‘रेवा’ आता एकत्र असून ‘वनश्री’ पूर्वीच्याच म्हणजे कॉन्टिनेंटल शेल्फच्या परिसरात मार्गक्रमण करत आहे. तिन्ही कासवांचा प्रवास पाहिला तर महासागरातील बदलत्या प्रवाहामुळे त्यांचा हा प्रवास दक्षिण दिशेने सुरू झाला असावा, असे निरीक्षण संशोधकांनी यापूर्वी नोंदवले आहे.
वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत वेळास, आंजर्ले, गुहागर किनाऱ्यांवरून ‘सॅटेलाइट टॅगिंग’ केलेल्या कासवांच्या आठवडाभरातील प्रवासाची माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार ‘प्रथमा’ कासव वेळास येथून गुजरातच्या दिशेने पुढे सरकू लागले होते. त्यानंतर या कासवाचा मुक्काम खोल समुद्रात गुजरातच्या हद्दीत होता. दरम्यान, ‘प्रथमा’ माघारी परतत असल्याचे दिसत आहे. ती दक्षिणेकडे, महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे आली. याआधी ती वेळास समुद्रकिनारी आली आणि सुमारे ८० किलोमीटर ऑफशोअरमध्ये दिसून येत होती. आता ती पुन्हा दक्षिणेकडे गेली असून वेंगुर्ले येथील वायंगणी समुद्रकिनाऱ्यासमोर सुमारे ३५ किलोमीटर ऑफशोअरमध्ये दिसून येत आहे.
..
चौकट
‘वनश्री’नेही पुढे पाऊल टाकले
‘रेवा’ उत्तरेकडे वळली आहे, तरीही ती कॉन्टिनेंटल शेल्फच्या काठावर २५० किलोमीटर ऑफशोअरवर आहे. आता ‘सावनी’देखील तिच्यात सामील झाली आहे. ‘वनश्री’नेही पुढे पाऊल टाकले आहे; पण ती कॉन्टिनेंटल शेल्फमध्येच राहिली आहे. सध्या ती त्याचठिकाणी दिसून येत आहे.
------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62242 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..