
रत्नागिरी- भारत पेट्रोलियमच्या सर्व डेपोंवर शॉर्टेज
इंधन चित्र वापरा
............
भारत पेट्रोलियमच्या सर्व डेपोंवर इंधन तुटवडा
उदय लोध; आज उद्या तुटवडा अधिक जाणवणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः राज्यात सध्या पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवू लागला आहे. विशेष करून भारत पेट्रोलियमच्या सर्व डेपोंवर हे शॉर्टेज आहे, कंपन्यांनी पेमेंट्सच्या टर्म अचानक बदललेल्या आहेत, त्यात पैसे देऊन सुद्धा भारत पेट्रोलियममध्ये माल मिळत नाहीय अशी माहिती फामपेडाचे (फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन) अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना लोध यांनी सांगितलं की, सध्या अचानक इंधनाचा तुटवडा ऑईल कंपन्यांकडून सुरू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने भारत पेट्रोलियमने गेले २ दिवस जवळपास सर्वच डेपोंमध्ये इंधन पुरवठा बंद केला आहे. कंपन्या कोणतीही कारणं देताहेत, दिलेली कारणं लॉजिकल वाटत नाहीयेत, आणि डीलरला सप्लाय नाकारला जातोय, इतर दोन कंपन्या आणि भारत पेट्रोलियमने सुद्धा अचानक पेमेंट्सच्या टर्म बदलल्या, पूर्वी सकाळी माल दिला तर संध्याकाळपर्यंत पैसे देऊन चालायचे, पण त्याच दिवशी पेमेंट व्हायचं. आता हे आदल्या दिवशी अॅडव्हान्स पैसे मागताहेत, त्यामुळे पैशाची रोटेशेनची साखळी बिघडली आहे. अॅडव्हान्स पैसे द्यायला शक्य होत नाहीयेत. मात्र, पैसे देऊन सुद्धा भारत पेट्रोलियममध्ये माल मिळत नाहीय, अशी परिस्थिती गेले २ दिवस आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार हा तुटवडा जास्त जाणवण्याची शक्यता आहे, असेही लोध यांनी नमुद केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62278 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..