कणकवली : एसटी टोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : एसटी टोल
कणकवली : एसटी टोल

कणकवली : एसटी टोल

sakal_logo
By

टोलनाक्‍याचा फटका
एसटी बसलाही शक्य

जाता-येता फेरीला ४६० रुपयांचा भुर्दंड

कणकवली, ता.२८ : सिंधुदुर्गातील ओसरगाव येथील टोलनाका कार्यान्वित झाल्‍यानंतर एसटी महामंडळालादेखील या टोलचा फटका बसणार आहे. टोल नाक्‍यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्‍येक एसटी बसला ४६० रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असणाऱ्या सिंधुदुर्ग विभागाचा तोटा आणखीच वाढणार आहे.
ओसरगाव येथील टोल नाक्‍याला जिल्ह्यातून तीव्र विरोध होत आहे; मात्र पुढील काळात पोलिस बंदोबस्तात हा टोल नाका सुरू होण्याची शक्‍यता आहे. हा टोलनाका सुरू झाल्‍यानंतर जिल्ह्यातील सर्वच चारचाकी वाहनचालकांना या टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ओसरगाव येथील टोल नाका हा सिंधुदुर्गच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी या तालुक्‍यातील अनेक वाहनचालक कामानिमित्त नेहमीच सिंधुदुर्गनगरी येथील मुख्यालयी जा-ये करत असतात. याशिवाय कणकवली, देवगड, विजयदुर्ग, वैभववाडी आगारातील बसेस मुख्यालयात जात असतात. सर्वच तालुक्‍यातील एसटी आगारातील बसेसना या टोलनाक्‍यावरूनच ये-जा करावे लागणार आहे. त्‍यामुळे एसटी प्रशासनाला या टोलचा मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एसटी बस आणि ट्रक या वाहनांच्या सिंगल एन्ट्रीसाठी ३०५ रुपयांचा टोल आहे, तर परतीचा प्रवास असल्‍यास एकूण ४६० रुपयांचा टोल आहे. यात एसटीच्या जेवढ्या फेऱ्या होतील तेवढा टोल द्यावा लागणार असल्‍याची माहिती टोल वसुली करणाऱ्या कंपनीकडून देण्यात आली.
--
कंपनीकडून तीन महिन्यांची रक्‍कम
टोल वसुलीचा ठेका हैदराबाद येथील एका कंपनीला मिळाला आहे. या कंपनीला प्रतिदिनी साडेसहा लाख रुपयांच्या टोल वसुलीचे ‍उद्दिष्ट आहे. त्यानुसार तीन महिन्यांची सुमारे सहा कोटींची रक्‍कम या कंपनीने केंद्र सरकारकडे भरणा केली आहे. त्‍यामुळे १ जूनपासून टोल वसुली करण्यासाठीची तयारी या कंपनीने केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62363 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top