कणकवली : अपघात वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : अपघात वृत्त
कणकवली : अपघात वृत्त

कणकवली : अपघात वृत्त

sakal_logo
By

24908
ओसरगाव : जखमींना रुग्णालयात हलविताना पोलिस व इतर.

ट्रकच्या धडकेत दोघे जखमी

ओसरगाव टोल नाका येथील घटना

कणकवली, ता.२८ : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाका येथे उभ्या असलेल्या एका वाहनाला मागाहून येणाऱ्या आयशर ट्रकची धडक बसली. पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. यात आयशर ट्रकमधील दोघे जखमी झाले आहेत, तर ज्या वाहनावर ट्रक धडकला ते वाहन अपघातानंतर पसार झाले.
आयशर ट्रक (एम एच ०८ डब्लू ८३९७) हा गोवा ते मुंबई असा जात होता. पहाटे पाचच्या सुमारास महामार्गावरील ओसरगाव टोलनाका येथील एका उभ्या असलेल्या वाहनाला ट्रकची मागाहून धडक बसली. अपघातानंतर उभे असलेले वाहन घेऊन चालक पसार झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा वाहतूक पोलिस शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पुजारे, हेड कॉन्स्टेबल सुशांत पवार, पोलिस नाईक धुरी, वागतकर व नाईक यांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकलेले जखमी प्रवासी प्रवीण संजय कोंडगे (वय २९, रा. चांदणी चौक, बावधन, पुणे) आणि पोपट शिवाजी साळुंखे (वय ३४ रा. कराड, जि. सातारा) यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात आयशरच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला होता. पत्रा वाकवून आत अडकलेल्या दोघांना वाहतूक पोलिसांनी बाहेर काढले आणि १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तर अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. कणकवली पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62382 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top