मोटार-रिक्षा अपघातात देवगडात एक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटार-रिक्षा अपघातात देवगडात एक जखमी
मोटार-रिक्षा अपघातात देवगडात एक जखमी

मोटार-रिक्षा अपघातात देवगडात एक जखमी

sakal_logo
By

देवगडात अपघातात एक जखमी
देवगड ः समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्यासाठी रस्त्याकडेला उभ्या केलेल्या मोटारीला रिक्षाची धडक बसून झालेल्या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला. हा अपघात देवगड पवनचक्की उद्यानाकडे जाणाऱ्या मार्गावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडला. दरम्यान, उशिरापर्यंत अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक पवनचक्की उद्यानाकडे जात असताना समोरच्या वाहनाला बाजू देण्यासाठी गाडी रस्त्याकडेला थांबली होती. याचदरम्यान त्याच दिशेने जाणाऱ्या रिक्षाची धडक बसून अपघात झाला. अपघातात रिक्षा चालक युवक जखमी झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62392 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top