पाळीव जनावरांना लसीकरण पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाळीव जनावरांना लसीकरण पूर्ण
पाळीव जनावरांना लसीकरण पूर्ण

पाळीव जनावरांना लसीकरण पूर्ण

sakal_logo
By

86495

पाळीव जनावरांचे लसीकरण पूर्ण

पशुसंवर्धन अधिकारी ः टॅग लावण्याचे कामही १०० टक्के

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ ः पावसाळी कालावधीत जनावरांना उद्भवणार्‍या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारी घेण्यात आली असून, जिल्ह्यातील जनावरांना १०० टक्के लसीकरण करून संरक्षित करण्यात आली आहेत. तसेच टॅग लावण्याचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जनावरांना लाळ (पायलाग) प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यासाठी यावर्षी एकूण १ लाख ४३ हजार १०० लस प्राप्त झाल्या असून, सर्व तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात वितरित करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत १ लाख ३६ हजार ६३५ जनावरांना लस देण्यात आली आहे. लाळ (पायलाग) हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगास प्रतिबंध करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या आजारामुळे तोंडात फोड, व्रण येऊन जखमा होतात. जनावरांच्या जिभेची साल निघते. तोंडातून लाळ गळते. त्यामुळे जनावर चारा खाणे बंद करतात. जनावरांच्या पायांच्या खुरांमध्ये फोड आल्याने जखमा तयार होतात. त्या जखमांवर किडेही पडतात. त्यामुळे जनावर चालताना लंगडते. त्यांना ताप येतो. थकवा निर्माण होऊन कोणतेही काम करू शकत नाही. हा आजार वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. या रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी १ लाख ४३ हजार १०० लस प्राप्त झाल्या होत्या. जिल्ह्यात एकूण १ लाख ५७ हजार ४०९ एवढे पशुधन आहे; परंतु काही शेतकरी आपल्या जनावरांना लसीकरण करून घेत नाहीत. तसेच काही जनावरे ६ महिन्यांपेक्षा कमी वय असलेली आहेत. त्यामुळे उपलब्ध लसीनुसार १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३६ हजार ६३५ जनावरांचे लसीकरण पूर्ण करून जनावरे साथ रोगापासून संरक्षित करण्यात आली आहेत, अशी माहिती डॉ. शिंपी यांनी दिली.
.............
कोट
जिल्ह्यात शेतीच्या हंगामात पावसाळ्यात जनावरांना साथीचे आजार झाल्यास औषधोपचार करता यावेत, यासाठी आवश्यक औषधांची खरेदी केली आहे. यासाठी ४६ लाख निधी खर्च केला आहे. सर्व औषधे पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पुरविली आहेत.
- डॉ. दिलीप शिंपी, पशुसंवर्धन अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62413 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top