वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीजपुरवठा सुरळीत 
न केल्यास आंदोलन
वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन

वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन

sakal_logo
By

24930
वैभववाडी ः महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना नगरपंचायतीचे पदाधिकारी.

वैभववाडीत वीजेचा खेळखंडोबा

सर्वपक्षीय आक्रमक; प्रसंगी आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २८ ः येथील शहरात सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा थांबवून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा वीज कार्यालयासमोर आंदोलन छेडू, असा इशारा वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नेहा माईणकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी महावितरणला दिला.
वैभववाडी शहरात सध्या सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. पाऊस, वादळ, विजांचा लखलखाट यापैकी काहीही नैसर्गिक आपत्ती नसताना शहरातील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. शहरातील विजेवर अवलंबून असलेली अनेक कामे खोळंबली आहेत. विजेअभावी शहरातील पाणीपुरवठा वेळापत्रकही कोलमडले आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नळपाणी पुरवठा योजनेचा पंप देखील नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करावा, यासाठी नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेवक रणजित तावडे, विवेक रावराणे, मनोज सावंत, सुप्रिया तांबे, राजन तांबे आदींसह सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना जाब विचारला. दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर सर्वपक्षीय आंदोलन छेडू, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी महावितरणला दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62415 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top