मालवण सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विद्याधर केनवडेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवण सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विद्याधर केनवडेकर
मालवण सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विद्याधर केनवडेकर

मालवण सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विद्याधर केनवडेकर

sakal_logo
By

मालवण पतसंस्थेच्या
अध्यक्षपदी केनवडेकर
मालवण, ता. २८ ः येथील मालवण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विद्याधर ऊर्फ बंटी केनवडेकर, तर उपाध्यक्षपदी उमेश मांजरेकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांनी ही निवड जाहीर केली. संस्था कार्यालयात झालेल्या निवडणूक कार्यक्रमास सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
मालवण नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती. यात संचालक म्हणून लक्ष्मीकांत खोबरेकर, चंद्रकांत रेवंडकर, विद्याधर केनवडेकर, नीलेश पांजरी, दत्तात्रय केळुसकर, उमेश मांजरेकर, चंद्रशेखर कुशे, दिलीप बिरमोळे, मनोज चव्हाण, शुभदा केनवडेकर, स्वाती हळदणकर, कृष्णा चव्हाण हे बिनविरोध निवडून आले होते. संस्था अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून श्री. केनवडेकर यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून गणेश कुशे, तर अनुमोदक म्हणून उमेश मांजरेकर होते. उपाध्यक्षपदासाठी श्री. मांजरेकर यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून मनोज चव्हाण, तर अनुमोदक म्हणून दिलीप बिरमोळे होते. दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. यावेळी संस्था सचिव राधिका हळदणकर, लिपीक मोनिका तळगावकर, ज्योत्स्ना चव्हाण, प्रमिला मोर्जे, श्‍वेता हळदणकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62427 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top