चिपळूण ः स्थानिकाना नोकरी न दिल्यास धडा शिकवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः स्थानिकाना नोकरी न दिल्यास धडा शिकवणार
चिपळूण ः स्थानिकाना नोकरी न दिल्यास धडा शिकवणार

चिपळूण ः स्थानिकाना नोकरी न दिल्यास धडा शिकवणार

sakal_logo
By

थ्री एम पेपर मिलमध्ये स्थानिकांना नोकरी द्या

राष्ट्रवादीचे नेते खताते यांचा मागणी; ..तर धडा शिकवणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः कोकणातील सर्वात जुनी औद्योगिक वसाहत म्हणून खेर्डीची ओळख. स्थानिकांना रोजगार मिळावा, म्हणून येथील ग्रामस्थांनी त्रास सहन केला. थ्रीएम पेपर मिल खेर्डीतील सर्वात मोठी कंपनी. गेल्या दोन-तिन वर्षापासून कंपनीत स्थानिकांना नोकरीची संधी दिली जात नाही. तेथील व्यवस्थापक गावाकडील लोकांची भरती करीत आहे. क्षमता असतानाही येथील स्थानिकांनी संधी दिली जात नाही. कंपनीत स्थानिकांना संधीच मिळत नसेल तर त्यांचा त्रास तरी कशाला सहन करायचा. त्यामुळे आता त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी पत्रकार परिषदेत दिला.
स्थानिकांना न्याय मिळण्यासाठी पक्षविरहीत संघर्ष समिती स्थापन करून लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, स्थानिकांना गावातच रोजगाराची साधने उपलब्ध होण्यासाठी काही वर्षापूर्वी लोकांना १५ रूपये प्रति गुंठा दराने जागा दिल्या. कंपन्यांना उभारी मिळण्यासाठी लोकांनी सहकार्य केले. औद्योगिक वसाहतती थ्रीएम पेपर मिल, सर्वात मोठी कंपनी. ही कंपनी नियमितपणे सुरू राहण्यासाठी आम्ही खूप सहकार्य केले. मात्र, आता त्यांची कामकाज पद्धत बदलली. व्यवस्थापक बदलल्याने कामकाज पद्धतीत फरक पडला. स्थांनिकांना कामगार भरती प्रक्रियेत स्थान दिले जात नाही. परप्रांतीय लोकांची आतल्या अंगाने भरती केली जाते. व्यवस्थापक स्वामी हे त्यांच्या गावाकडील तरूणांची भरती करतात. कंपनीतील विविध कामकाजाचे ठेकेही परप्रातीय लोकांनाच दिले जातात. यामध्ये स्थानिकांना घरचा रस्ता दाखवला जातो. कंपनीत आणलेला कच्चा माल परिसरात असाच टाकला जातो. वारंवार त्याला आग लागण्याचा घटना घडतात. अनेकदा मुद्दामहून आग लावली जाते. कंपनीत आणलेली मळी तर थेट नदीत सोडली जाते. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. खेर्डी व चिपळूणकरांना दुषित पाणी प्यावे लागते. विज निर्मिती प्रकल्पाचा तर कर्कश आवाज असतो. कंपनीतील महिला कामगारांना कसल्याही सुविधा नाहीत. स्थानिकांनी मुद्दामहून पगारवाढ दिली जात नाही. त्यामुळे या कंपनीला स्थानिक ग्रामस्थ धडा शिकवल्याशिवाय शांत राहणार नाहीत, असा इशारा तालुकाध्यक्ष खताते यांनी दिला.
.............
चौकट
..म्हणून निमुटपणे सहन करतो
थ्री एम पेपर मिल कंपनीकडून प्रदुषणाबाबत शासनाचे विविध नियम पायदळी तुडवले जातात. आंदोलन करून कंपनी बंद झाली तर स्थानिक कामगारांवरच उपासमारीची वेळ येईल. म्हणून आम्ही सर्वकाही निमुटपणे सहन करीत होतो. मात्र, आता झाले ते खूप झाले.
.................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62438 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top