
अहिल्यादेवी ट्रस्टचे कार्य गौरवास्पद
24975
सातारा ः प्रवीण काकडे यांचा सत्कार करताना प्रा. अभयकुमार साळुंखे.
अहिल्यादेवी ट्रस्टचे कार्य उत्कृष्ट
प्रा. साळुंखे ः प्रवीण काकडे यांचा साताऱ्यात सत्कार
तळेरे, ता. २८ ः कोरोनाच्या काळात गेल्या दोन वर्षांपासून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट राज्यातील विविध सात जिल्ह्यातील गरीब मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अहोरात्र झटत आहे. ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यासाठी विशेष मेहनत घेत असून, त्यांचे हे कार्य कार्य निश्चितच गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन प्रा. अभयकुमार साळुंखे यांनी सातारा येथे केले.
यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन शशिराव शेंडगे यांनी आपल्या पुतणीच्या विवाहाप्रित्यर्थ या कार्यासाठी ५१ हजाराची देणगी दिली. सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे व रायगड या सातही जिल्ह्यातील डोंगर-दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून, महापूर व अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागातील व दरडग्रस्त भागातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत श्री. काकडे यांनी घेतली. कोरोना काळात ३२९३ मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील काशीळ येथे श्री. शेंडगे यांनी सातारा येथे लग्न समारंभादरम्याम अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टसाठी प्रा. साळुंखे यांच्या हस्ते श्री. काकडे यांच्याकडे ५१ हजाराची आर्थिक मदत सुपुर्द केली. यावेळी श्री. काकडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, माजी सहसचिव आर. के. भोसले, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक पतसंस्थेचे चेअरमन उत्तम गलांडे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62500 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..