चिपळूण ः गाळ उपसा अखेरच्या टप्प्यात मंदावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः गाळ उपसा अखेरच्या टप्प्यात मंदावला
चिपळूण ः गाळ उपसा अखेरच्या टप्प्यात मंदावला

चिपळूण ः गाळ उपसा अखेरच्या टप्प्यात मंदावला

sakal_logo
By

- ratchl284.jpg
L24989
- चिपळूण ः वाशिष्ठी नदीतून करण्यात येणारा गाळ उपसा.
--------------
गाळ उपसा अखेरच्या टप्प्यात मंदावला

यंत्रणा अपुरी; गाळाची विल्हेवाट हे मोठे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः २२ जुलै २०२१ रोजी आलेल्या महापूरास नद्यातील गाळ कारणीभूत असल्यावर एकमत झाल्यावर शहरातून वाहणाऱ्या शिवनदीसह वाशिष्ठी नदीत १५ मेपर्यंत साडेसहा लाख घनमीटर गाळ उपसा केला आहे. त्यावर आतापर्यत साडेपाच कोटीचा खर्च झाला. गेली साडेपाच महिने गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात तुटपुंजी यंत्रणा गाळ उपशासाठी कार्यरत असल्याने हे अभियान बारगळल्याची टीका होत आहे. सध्या काठावर काढून ठेवलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान स्थानिक प्रशासनापुढे आहे.
वाशिष्ठी नदीत जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने तर साडेसात कि.मी.च्या शिवनदीत नाम फाऊंडेशनने गाळ उपसा केला. गेली साडेचार महिने दोन्ही नद्यांतून गाळ उपसा केला जात आहे. १५ मेपर्यंतच्या पाटबंधारेच्या आकडेवाडीनुसार वाशिष्ठी नदीतून महामार्ग चौपदरीकरणासाठी ३५ हजार, यांत्रिकी विभागाने ४ लाख ३० हजार, तर शिवनदीत नाम फाऊंडेशनने १ लाख ९५ हजार असे मिळून साडेसहा लाख घनमीटर गाळ काढला गेला आहे. पाऊस पडेपर्यत गाळ उपसा अभियान हे सुरूच राहणार आहे. यंत्रसामुग्रीला लागणाऱ्या इंधनाचा खर्च हा शासनाने मंजूर केलेल्या निधीतून केला जात असून आतापर्यत साडेपाच कोटीचा खर्च झाला असल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.
-----------------------------------
चौकट
उक्ताड बेटावरील गाळाचा ढिग
दरम्यान, पाऊस सुरू होईपर्यत नद्यांतील गाळ उपसा अभियान सुरूच राहणार असल्याचे पाटबंधारे विभाग सांगत असले तरी सध्या काठावर काढून ठेवलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान स्थानिक प्रशासनापुढे आहे. उक्ताड बेटावरील गाळाचा ढिग अजूनही पडून आहेत. या ढिगाचे नेमके काय होणार, असा प्रश्न पडला आहे. सध्या कार्यरत असलेली यंत्रसामुग्रीही तुटपूंजी आहे. वाहने असली तरी त्याला चालक नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे वाशिष्ठीतील गाळ अभियान अखेरच्या टप्प्यात बारगळल्याची टीका होऊ लागली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62520 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top