वेब सिरिजचे चित्रीकरण सावंतवाडीत बंद पाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेब सिरिजचे चित्रीकरण सावंतवाडीत बंद पाडले
वेब सिरिजचे चित्रीकरण सावंतवाडीत बंद पाडले

वेब सिरिजचे चित्रीकरण सावंतवाडीत बंद पाडले

sakal_logo
By

25029
सावंतवाडी ः वेबसिरिज चित्रिकरण सुरू असताना झालेली वाहतूक कोंडी.

वेबसिरिजचे चित्रिकरण
सावंतवाडीत बंद पाडले
सावंतवाडी, ता. २८ ः शहरात भररस्त्यात सुरू असलेले वेब सिरिजचे चित्रिकरण पोलिसांनी बंद पाडले. चित्रिकरण करताना पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच रस्त्यात वाहतूक कोंडी करून हे चित्रीकरण करण्यात येत असल्याने पोलिसांनी ही भूमिका घेत संबंधितांना पोलिस ठाण्यात बोलवून घेतले. उशिरापर्यंत पोलिसांकडून परवान्याची तपासणी सुरू होती.
शहरात मोती तलावाच्या काठावर एका वेब सिरिजचे चित्रीकरण सुरू होते. हे चित्रीकरण करीत असताना सर्व नियम पायदळी तुडवल्याचे दिसत होते. चित्रीकरण बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक काठावर जमा झाले होते. यामुळे वाहतूककोंडी झाली. बराच वेळ हा प्रकार सुरू होता. चित्रिकरणासाठी पोलिसांचा लोगो वापरून व्हॅन तयार केली होती. अखेर उशिरा वाहतूक पोलिस राजा राणे व रामचंद्र साटेलकर यांनी तेथे दाखल होत चित्रीकरण बंद पाडले. तसेच दिग्दर्शक, व्यवस्थापकांना बोलावून माहिती घेतली. त्यानंतर या सर्वांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. तेथे कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62571 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top