कुडाळातील ‘तो’ वड भाजपमुळे वाचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळातील ‘तो’ वड भाजपमुळे वाचला
कुडाळातील ‘तो’ वड भाजपमुळे वाचला

कुडाळातील ‘तो’ वड भाजपमुळे वाचला

sakal_logo
By

25094
कुडाळ ः वडाचे झाड वाचविण्यासाठी एकत्र आलेले भाजपचे नगरसेवक.

भाजपच्या नगरसेवकांमुळे
कुडाळातील ‘तो’ वड वाचला
कुडाळ ः शहरातील शासकीय जागेत असलेले वडाचे झाड तोडण्यासाठी गेले अनेक दिवस युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. या ठिकाणी रस्त्यालगत गटार बांधण्यात येणार असून, त्यामुळे वडाचे झाड तोडण्याचा घाट घालण्यात आला होता; पण भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत हे झाड वाचविले. शहरातील राजमाता जिजाऊ चौकातील ग्रामीण रुग्णालयाच्या जागेत असलेले वडाचे झाड जर कोणी तोडण्याचा प्रयत्न करत असेल, तर भाजप गप्प बसणार नाही. त्याला तोडीस तोड उत्तर दिले जाईल आणि झाड तोडण्यास विरोध केला जाईल, असा थेट इशारा काही दिवसांपूर्वी वसुंधरा दिवसानिमित भाजपाच्या पदाधिकारी तसेच नगरसेवकांनी दिला होता. यावेळी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, स्थानिक नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक अॅड. राजीव कुडाळकर, राजेश पडते, तन्मय सावंत यांसह भाजपचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
--
25215
तुषार वेंगुर्लेकर

मूल्यमापन समितीत वेंगुर्लेकर
सावंतवाडी ः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अभ्यासकेंद्राच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन पाहणी समितीमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून तुषार वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली. अभ्यास केंद्राच्या कार्यपद्धतीचे नियंत्रण करण्यासंदर्भात संचालक विद्यार्थी सेवा विभागाच्या आदेशानुसार अभ्यास केंद्राची पाहणी करून त्यांच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन करायचे आहे. या पाहणी समितीमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून डॉ. जे. बी. नाईक आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेजद्वारा आरपीडी ज्युनियर कॉलेजचे केंद्रप्रमुख श्री. वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या निवडीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला योग्य प्रतिनिधित्व मिळाले आहे. गेली २५ वर्षे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ज्ञानगंगा घरोघरी पोहचवविण्याचे पवित्र कार्य ते करत आहेत. यांची निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
--
25213
विनायक राऊत

खासदार राऊत आज जिल्ह्यात
कुडाळ ः लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा नियोजित दौरा असा ः सोमवार (ता. ३०) दुपारी एकला मुंबई येथून चिपी विमानतळ येथे आगमन, अडीचला तुळस (ता. वेंगुर्ले) जैतीर मंदिर येथे उत्सवास उपस्थिती, सायंकाळी सहाला वेळागर-शिरोडा येथे ‘३५ वी सीनियर नॅशनल टग ऑफ वॉर’ रस्सीखेच स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थिती (ता. वेंगुर्ले), सायंकाळी साडेसातला ‘कोकणकन्या’ने चिपळूणकडे प्रयाण.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62674 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top