कसाल-मालवण बसफेरीचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसाल-मालवण बसफेरीचा प्रारंभ
कसाल-मालवण बसफेरीचा प्रारंभ

कसाल-मालवण बसफेरीचा प्रारंभ

sakal_logo
By

कसाल-मालवण बसफेरीचा प्रारंभ
कसाल ः मालवण आगाराच्या कसाल बसस्थानकातून सुटणार्‍या कसाल-खोटले वायंगवडे मार्गे, कट्टा-मालवण या बसफेरीचा प्रारंभ नुकताच कसाल बसस्थानक येथे वायंगवडे माजी सरपंच गणपत सुद्रिक यांच्या हस्ते करण्यात आला. कसाल बस स्थानकामधून ही बस सकाळी १०.१५ वाजता कसाल, खोटलेवायंगवडे मार्गे कट्टा-मालवण अशी धावेल. यानंतर दुपारी १३.३० वाजता कसाल खोटलेवायंगवडे कट्टा अशी जाईल. त्यानंतर परत दुपारी १४.१० वाजता कट्टा येथून खोटले- वायंगवडे मार्गे कसाल बसस्थानकात येईल. यानंतर दुपारी १६.२० मिनिटांनी सुकळवाड मार्गे तळगाव येथे पोहोचेल, अशी माहिती वाहक नियंत्रक कक्षाचे महेश तावडे यांनी दिली. प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
----------
अनिल देसाईंचा गोळवणला सत्कार
बागायत ः शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यातील गोळवण येथील सारा रिसॉर्ट येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत बैठक झाली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत गोळवण शिवसेनेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन खासदार अनिल देसाई यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुंबईचे माजी नगरसेवक अशोक पटेल, सारा हॉटेलचे सुरेश सावंत, शिवसेना उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण, माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण, माजी उपतालुकाप्रमुख राजू नाडकर्णी, गोळवण शाखाप्रमुख सुभाष सामंत, डिकवल शाखाप्रमुख भालचंद्र गावडे, जनार्दन गावडे, गणेश मुणगेकर, झिलू गावडे, मोहन पवार, गोळवण महिला शाखाप्रमुख मंगल चिरमुले, पप्पी मांजरेकर, बाळाजी खरात आदी उपस्थित होते.
------------
कलंबिस्त परिसरात विजेचा खेळखंडोबा
ओटवणे ः सह्याद्री पट्ट्यातील गावात वीज वितरण विभागाचा सावळागोंधळ सुरू आहे. कलंबिस्त पंचक्रोशीत गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून वीजपुरवठा कमी दाबाने सुरू आहे. काही वेळात वीज फुल्ल, तर काही सेकंदात विजेचा दाब कमी असा खेळ पाहायला मिळत आहे. येत्या आठवडाभरात हा प्रकार बंद न झाल्यास वीज वितरणच्या सावंतवाडी तालुका कार्यालयावर मोर्चा आणण्याचा इशारा या भागातील ग्रामस्थांनी दिला आहे.
-------------
मळेवाड सोसायटी अध्यक्षपदी पार्सेकर
मळेवाड ः मळेवाड विविध कार्यकारी सहकारी सोसायटी अध्यक्षपदी प्रकाश पार्सेकर, तर उपाध्यक्षपदी प्रकाश राऊत यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदिनी माळगावकर यांनी काम पाहिले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिवसेना पुरस्कृत पॅनेलमधून अध्यक्षपदासाठी प्रकाश पार्सेकर, उपाध्यक्षपदासाठी प्रकाश राऊत यांनी अर्ज दाखल केला. तर भाजप पुरस्कृत पॅनेलमधून अध्यक्षपदासाठी दत्ताराम नाईक व उपाध्यक्षपदासाठी विठ्ठल मोरुडकर यांनी अर्ज दाखल केला. निवडणूक होऊन सात विरुद्ध पाच मतांनी शिवसेना पॅनेलचे उमेदवार विजयी झाले.
--------------
मोरगाव सोसायटी चेअरमनपदी ठाकुर
दोडामार्ग ः मोरगाव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी रमेश ठाकुर व व्हाईस चेअरमनपदी कमलाकर गवस यांची निवड झाली. भाजप पुरस्कृत देव म्हाताराबाबा परिवर्तन विकास पॅनलने शिवसेना पुरस्कृत पॅनलचा दहा विरुद्ध दोन मतांनी पराभव केला. बिनविरोधाची परंपरा असलेल्या मोरगाव सोसायटीची यंदाची निवडणूक पक्षीय पातळीवर लढली गेली. या निवडणुकीत भाजपचे आठ व शिवसेना पुरस्कृत पॅनलचे पाच संचालक निवडून आले. चेअरमन पदासाठी शिवसेनेच्या गटातून मोर्चेबांधणी सुरू असल्याने निवडणुकीची उत्सुकता वाढली होती. मात्र, ऐन निवडणुकीच्या वेळी आठ सदस्य संख्या असलेल्या भाजप पुरस्कृत पॅनेलच्या रमेश ठाकुर व व्हाईस चेअरमन कमलाकर गवस यांना चक्क दहा मते मिळाली, तर प्रदीप सावंत यांना केवळ दोन मते मिळाली. निवडणुकीत प्रदीप ठाकुर, रवी चव्हाण, रवी पिरणकर, रमेश कदम, श्री. झोरे, मीनाक्षी पवार, मनीषा देऊलकर, श्री. ठाकुर आदी संचालक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62693 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top