मंडणगड - दिव्यांग आरोग्य शिबिरात 298 जणांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड - दिव्यांग आरोग्य शिबिरात 298 जणांची तपासणी
मंडणगड - दिव्यांग आरोग्य शिबिरात 298 जणांची तपासणी

मंडणगड - दिव्यांग आरोग्य शिबिरात 298 जणांची तपासणी

sakal_logo
By

-rat29p19.jpg
L25130
- मंडणगड : आरोग्य तपासणी व प्रमाणपत्र नावनोंदणी करण्यासाठी तालुक्यातील दिव्यांगांनी ग्रामीण रुग्णालयात केलेली गर्दी.
-------------
मंडणगड ग्रामीण रुग्णालयात
२९८ दिव्यांगांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २९ ः अस्थिव्यंग, अंध, दिव्यांग, गतिमंद अशा सर्व प्रकारांतील व्यंग असलेल्या दिव्यांगांची तपासणी व प्रमाणपत्र प्रक्रिया मंडणगडमध्ये प्रथमच राबविण्यात आली. शिबिरात २९८ दिव्यांग व्यक्तींनी आपली तपासणी करून घेतली. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या वतीने भिंगळोली ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील दिव्यांगांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
शिबिरात अपंगत्वाचे नवीन प्रमाणपत्र देणे, पूर्वी प्रमाणपत्र धारण करणाऱ्यांची आरोग्य तपासणी करणे, त्यांची प्रमाणपत्र अपडेट करणे असे कार्यक्रम नियोजित करण्यात आले होते. तालुक्यातील शेकडो दिव्यांग व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालयाबाहेर सकाळपासूनच नोंदणीसाठी रांगा लावल्याने ग्रामीण रुग्णालयाबाहेर गर्दी झाली होती. तपासणी व प्रमाणपत्रासाठी गोळा झालेल्यांसाठी ग्रामीण रुग्णालयाबाहेर मंडप टाकून उभी करण्यात आलेली बैठक व्यवस्था कमी पडली. याचबरोबर पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती.
अनेक वर्षांनंतर तालुक्याचे ठिकाणी अशा प्रकारे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांच्या अपक्षेपेक्षा अधिक दिव्यांग नातेवाईकांसह तपासणीसाठी उपस्थित झाले. अपंग प्रमाणपत्राची पहिल्यांदाच मागणी करणाऱ्या किती नवीन दिव्यांगांना या शिबिरात सर्व प्रशासकीय सोपस्कर पूर्ण करून प्रमाणपत्र मिळाले, ही आकडेवारीही उपलब्ध झाली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62727 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top