
दाभोळ-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा
एका कासवाला जीवदान,
एकाचा मृत्यू
दाभोळ ः आंजर्ले समुद्रकिनारी माशांच्या जाळ्यात अडकलेल्या सागरी कासवाला ग्रामस्थांनी पर्यटकाच्या मदतीने नुकतेच जीवदान दिले. मात्र, एका कासवाचा अगोदरच जाळ्यात मृत्यू झाला होता. आंजर्ले भंडारवाड्यात राहणारे प्रभाकर तोडणकर हे सकाळी समुद्र किनारी चालण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांना जाळयामध्ये दोन सागरी कासवे अडकलेली आढळून आली. त्यांनी परिसरातील ग्रामस्थ व किनाऱ्यावरील पर्यटकांना बोलावले. सदेश बेलकर, अभिनय केळसकर आदी ग्रामस्थांसह जमलेल्या पर्यटकांच्या मदतीने जाळ्यातून या कासवांची सुटका केली. मात्र त्यातील एका कासवाचा मृत्यू झाला होता.
-------------------
अहिल्यादेवी होळकरांच्या
जयंतीनिमित्त कार्यक्रम
खेड ः धनगर समाजाचे आराध्यदैवत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ वी जयंती महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र कोकण धनगर विकास मंडळाच्या अधिपत्याखाली खेड तालुक्यात ३१ मे रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत करण्यात आले आहे. समाजबांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र कोकण धनगर विकास मंडळाचे सचिव गणपत गोरे यांनी केले आहे. हा कार्यक्रम भरणे येथील समाज भवन कार्यालयात होईल.
------------
दापोली-विजापूर एसटी सुरू
दाभोळ ः दापोली-विजापूर बस दापोली आगरामार्फत सुरू करण्यात आली आहे. ही बस खेड, चिपळूण, कोयनानगर, पाटण, कराड, पेठनाका, सांगली, मिरज, कागवाड, म्हैसाळ, अथणी, तिकोटामार्गे विजापूरला जाणार आहे. ही बस दापोली येथून दररोज संध्याकाळी ४ वाजता, तर विजापूर येथून संध्याकाळी ४ वाजता सुटणार आहे. या बसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दापोली आगाराने केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62729 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..