अनुष्का कदम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुष्का कदम यांना
आदर्श शिक्षक पुरस्कार
अनुष्का कदम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

अनुष्का कदम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

sakal_logo
By

25153
बीड ः येथे पुरस्कार स्वीकारताना अनुष्का कदम.

अनुष्का कदम यांना
आदर्श शिक्षक पुरस्कार
मालवण, ता. २९ : माध्यमिक विद्यालय बिळवस येथील उपक्रमशील शिक्षिका अनुष्का कदम यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था उस्मानाबाद यांच्या मार्फत दिला जाणारा गुरु गौरव राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच बीड येथे सन्मानपूर्वक देण्यात आला.
कदम या दरवर्षी नवोपक्रम कृती संशोधन आदी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत असतात. जिल्हास्तरावर इंग्रजी विषयाच्या तज्ञ मार्गदर्शिका म्हणून काम करत आहेत. शिक्षणामध्ये सातत्याने नवीन कार्य करत असतात. या सर्वांची दखल उस्मानाबाद येथील या संस्थेने घेतली व नुकताच बीड येथे राज्यस्तरीय कार्यक्रमात अनुष्का कदम यांना शाल, श्रीफळ, महावस्त्र, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन गुरू गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सचिन लांडगे, गणेश नागरगोजे, बीड जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब ढाकणे प्रा. हनुमंत भोसले मन्नूसिंग परदेशी, गणेश घुले आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक जयवंत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पालव, सचिव अशोक पालव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कदम यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62738 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top