
रत्नागिरी- आज पीएम केअर योजनेचा लाभ मिळणार
पैसे चित्र वापरता येईल
...
पीएम केअर योजनेतील लाभाचे आज वितरण
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेले बालक लाभार्थी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन या योजनेअंतर्गत मिळणारे सर्व लाभ आणि सेवा देण्याचा कार्यक्रम सोमवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते पीएम केअर योजनेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी पीएम केअर फॉर चिल्ड्रेन (चिल्ड्रेन स्कीम) या योजनेची घोषणा केलेली आहे. कोविड- १९ या महामारीमुळे ज्या बालकांच्या दोन्ही पालक, कायदेशिर पालक, दत्तक पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या अंतर्गत सोमवारी सकाळी९. ४५ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते योजनेस पात्र लाभार्थ्यांना विविध लाभ उपलब्ध करून देण्याबाबतचा ऑनलाईन कार्यक्रम होणार आहे.
----------
चौकट 1
९ मुलांच्या खात्यावर ६२ लाख
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड- १९ मुळे दोन्ही पालक मयत होऊन अनाथ झालेली ९ बालके पीएम केअर योजनेकरीता पात्र आहेत. या बालकांच्या वयोमानानुसार जिल्हाधिकारी व लाभार्थी यांच्या संयुक्त पोस्ट खात्यावर एकूण रक्कम ६२ लाख ३१ हजार ७२० रुपये जमा झाले आहेत. ऑनलाईन कार्यक्रम संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पोस्टाचे पासबुक, हेल्थ कार्ड, प्रमाणपत्र व पंतप्रधानांचे मुलांना पत्र असलेले कीट लाभार्थ्यांना देणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62806 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..