राजापूर-धरणे बांधली, कालवे अपूर्णच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-धरणे बांधली, कालवे अपूर्णच
राजापूर-धरणे बांधली, कालवे अपूर्णच

राजापूर-धरणे बांधली, कालवे अपूर्णच

sakal_logo
By

सिंचन प्रकल्पः लोगो
...
-rat30p12.jpg
25308
राजापूर ः अर्जुना धरण.
-----------------
कालव्यांची कामे रखडली, शेतीला कधी मिळणार पाणी ?

राजापूर तालुक्यात पाणीसाठ्याचा उपयोग सिंचनासाठी शून्य; गाळाचा उपसाही नाही
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० ः तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने सिंचन प्रकल्प (धरणे) प्रस्तावित असून त्यापैकी आठ धरणांची कामे पूर्ण झाली आहेत. सहा कामे अद्यापही अपूर्ण आहेत. पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या कालव्यांची कामे रखडली असल्याने त्यापैकी बहुतांश धरणामधील पाणीसाठ्याचा उपयोग शेती वा पिण्याच्यादृष्टीने लोकांना होत नाही. अपूर्णावस्थेतील धरणांच्या कामांच्या पूर्तीबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणारे हे जलसिंचन प्रकल्प कालवे खोदाईसह पूर्ण कधी होणार आणि त्यातून शेतकऱ्‍यांच्या शेतशिवाराला पाणी कधी मिळणार? याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
पावसाळ्यामध्ये तालुक्यातून दुथडी भरून वाहणाऱ्‍या नद्या उन्हाळ्यामध्ये पाण्याअभावी कोरड्या शुष्क असतात. त्यामुळे पाणी अडविण्यासाठी तालुक्यामध्ये प्रस्तावित असलेली धरणे उपयुक्त ठरणार आहेत. धरणांमुळे तालुक्यातील हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येताना दरवर्षी भासणारी पाणीटंचाई दूर होण्यालाही उपयुक्त ठरणार आहे. मात्र, लाखोंचा खर्च करून बांधण्यात आलेल्या धरणांचा सद्यःस्थितीमध्ये फारसा उपयोग होताना दिसत नाही. तालुक्यातील कामे पूर्ण झालेल्या अनेक धरणांच्या कालव्यांची कामे रखडली आहेत. अनेक धरणांमध्ये वर्षानुवर्षे साचलेल्या गाळाचा उपसा झालेला नाही. त्यामुळे धरणांमध्ये अपेक्षित असलेला पाण्याचा साठा होत नाही. काम पूर्ण झालेल्या धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा असला तरी कालव्यांचे काम पूर्ण झालेले नाही. धरणामध्ये साठलेल्या पाण्याचा शेती वा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करणे शक्य होत नाही. रखडलेल्या धरणांची कामे पूर्ण होण्यासाठी आणखीन किती वर्ष लागणार, हे अद्यापही अनिश्चित आहे.
------------------
चौकट
दृष्टिक्षेपात राजापूर तालुका
*पूर्ण झालेले सिंचन प्रकल्प ः पाचल-दिवाळवाडी प्रकल्प, सौंदळ- बारेवाडी प्रकल्प, पाचल-तळवडे धरण, परूळे धरण, कोंड्ये धरण, जुवाठी प्रकल्प, केळवली प्रकल्प, वाटूळ प्रकल्प
*अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प ः ओझर प्रकल्प, पांगरे बुद्रुक धरण, कळसवली धरण, ताम्हाणे प्रकल्प, काजिर्डा-जामदा मध्यम प्रकल्प, अर्जुना मध्यम प्रकल्प

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62974 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top