
चिपळूण-चिपळुणात मल्टीपर्पज कम्युनिटी सेंटरची पायाभरणी
२ कॉलम उभी लावावी
...
-rat30p13.jpg
L25309
ः चिपळूण ः मार्गदर्शन करताना आमदार शेखर निकम.
----------------
कम्युनिटी सेंटर उद्योगनिर्मितीचे
केंद्र बनेलः आमदार शेखर निकम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः मुस्लिम समाजाच्या मल्टीपर्पज कम्युनिटी सेंटर इमारतीची पायाभरणी झाली. लवकरच या ठिकाणी सुसज्ज व सर्व सोयीसुविधांनीयुक्त इमारतही उभी राहील. यातील सभागृह उत्तम दर्जाचे होईलच; पण त्याचबरोबर विविध कार्यक्रम, उपक्रमांनी तो जिवंतही असेल. या सेंटरची इमारत नक्कीच शैक्षणिक, उद्योगनिर्मितीचे केंद्र बनेल, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले.
चिपळूण तालुका मुस्लिम समाज संस्थेतर्फे शहरातील गुहागर बायपास रोड येथील लाईफ केअर हॉस्पिटलशेजारी मल्टीपर्पज कम्युनिटी सेंटरची इमारत उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतीचा संग-ए-बुनियाद (पायाभरणी) कार्यक्रम रविवारी (ता. २९ मे) झाला. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. समाजासह सर्वच क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य केल्यास तो प्रश्न सहज मार्गी लागेल.
माजी आमदार रमेश कदम म्हणाले, चिपळूण शहराच्या जडणघडणीमध्ये मुस्लिम समाजाचा मोठा वाटा आहे. संस्थेने खडतर प्रवासातून घेतलेली झेप खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे समाजाच्या या मल्टीपर्पज कन्युनिटी सेंटरमधून चांगले विद्यार्थी घडतील, समाजाचे प्रबोधन होईल आणि समाजाला योग्यप्रकारे दिशा देण्याचं काम ही वास्तू करेल.
या वेळी उद्योजक वसंत उदेग, माजी अध्यक्ष हसन वांगडे, माजी कार्याध्यक्ष इब्राहीम दलवाई, मिरजोळीचे सरपंच कासम दलवाई आदींनी मनोगत व्यक्त करताना प्रकल्पासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यमान अध्यक्ष सलीम कासकर यांनी प्रकल्पासाठी जास्तीत जास्त दानशूर व्यक्ती, संस्थांनी आर्थिक सहयोग द्यावा, असे आवाहन केले.
------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62984 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..