संगमेश्वर-स्थानिक स्वराज्य संस्थेत सेनेचाच उमेदवार निवडून द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर-स्थानिक स्वराज्य संस्थेत सेनेचाच उमेदवार निवडून द्या
संगमेश्वर-स्थानिक स्वराज्य संस्थेत सेनेचाच उमेदवार निवडून द्या

संगमेश्वर-स्थानिक स्वराज्य संस्थेत सेनेचाच उमेदवार निवडून द्या

sakal_logo
By

स्थानिक स्वराज्य संस्थेत सेनेचाच उमेदवार निवडून द्या

संगमेश्वरातील शिवसंपर्क अभियानात खासदार जाधव यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. ३० ः आपले सरकार सामान्यांसाठी राबवत असलेल्या विविध शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवून सरकारच्या कामांचा लाभ दीनदुबळ्यांसाठी राबवून त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पक्षाचे सर्व उमेदवार निवडून आणून पक्षाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.
संगमेश्वर तालुक्यात शिवसंपर्क अभियान २६ व २७ मे या कालावधीत ठिकठिकाणी झाले. कोकणचा कॅलिफोर्निया करण्यासाठी कोकणात निःस्वार्थ सहकार चळवळ उभी करून शेती व्यवसाय योजना, महिला बचतगट योजना, उद्योग योजना आदी योजना राबवून कोकण सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी प्रयत्न केले तर जनता तुमच्यापाठी सदैव राहील, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला. या सपंर्क अभियानात लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष प्रितम शिंदे, सचिव सिद्धेश शिगवावकर, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे आदींनी सहभाग घेतला.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62985 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top