
रत्नागिरी ः जिल्हा काँग्रेसची बैठक उत्साहात
-rat30p1.jpg
25275
ः रत्नागिरी ः कॉंग्रेसभुवन येथे जिल्हा कॉंग्रेसच्या बैठकीत अनेक नूतन पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.
------------
जिल्हा काँग्रेसची बैठकीत निवडणुकीवर चर्चा
रत्नागिरी, ता. ३० ः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली काल ता. २९ रोजी जिल्हा निरीक्षक ॲड. गुलाबराव घोरपडे व आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेसची महत्वाची बैठक उत्साहात झाली. योवेळी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि जिल्ह्यातील निवडणुका याबद्दल सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीला जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यानंतर ऑल इंडिया काँग्रेसच्या सूचनेनुसार होणाऱ्या आजादी गौरव पदयात्रेबाबत सखोल चर्चा व नियोजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, आमदार हुस्नबानू खलिफे, प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष दीपक राऊत, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी आगाशे , प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत, सोशल मीडिया प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे ,वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हरिश शेकासन, जिल्हा सरचिटणीस बंडू सावंत, जिल्हा सरचिटणीस बंटी गोताड, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव,रत्नागिरी तालुकाध्यक्ष विकास पाटील, गुहागर तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62986 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..