वेंगुर्लेत २९ वर्षांनी जमले जीवाभावाचे सवंगडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत २९ वर्षांनी जमले जीवाभावाचे सवंगडी
वेंगुर्लेत २९ वर्षांनी जमले जीवाभावाचे सवंगडी

वेंगुर्लेत २९ वर्षांनी जमले जीवाभावाचे सवंगडी

sakal_logo
By

25396
वेंगुर्ले ः स्नेहमेळाव्यात एकत्र आलेले वेंगुर्ले हायस्कूलचे माजी विद्यार्थी.

वेंगुर्लेत २९ वर्षांनी जमले जीवाभावाचे सवंगडी

स्नेहमेळाव्याचे निमित्त; वेंगुर्ले हायस्कूलचे १९९२-९३ चे माजी विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३० ः वेंगुर्ले हायस्कूलमधील एस.एस.सी. ग्रुप १९९२-९३ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात झाला. या मेळाव्याला उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम, मनोगते सादर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. विविध कार्यक्रमांनी हा स्नेहमेळावा यादगार ठरला.
वेंगुर्ले-सागरेश्वर बीच येथील ‘दर्याराजा बीच रिसॉर्ट’ या रमणीय व निसर्गरम्य पर्यटनस्थळी या मेळाव्याचे आयोजन केले होते. तब्बल २९ वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या संवादाने संबंध अधिकच दृढ झाले. आपापल्या आयुष्यातील व करिअरमधील चढ-उतारांचे अनुभव कथन करीत सर्वांनी मने मोकळी केली. त्यामुळे पुढील आयुष्यासाठी नवचेतना प्राप्त झाल्याचा भास झाला.
एसएससीनंतर आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी-व्यवसायानिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले हे विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल २९ वर्षांनंतर स्नेहमेळाव्यात एकत्र आले होते. वेंगुर्लेतील स्थायिक व आता नोकरी निमित्ताने पुणे, मुंबई, गोवा, कतार, मध्यप्रदेशमध्ये असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला हा मेळा नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे मोठ्या उत्साहात झाला.
यावेळी माजी विद्यार्थी राकेश परब, सुमन परब, बाळा आरांवदेकर, सुधीर गावडे, विनोद परब, आनंद परब, अनंत परब, हेमंत चव्हाण, यशवंत उर्फ बली नाईक, केदार आंगचेकर, प्रसाद मराठे, नामदेव सरमळकर, ललिता जाधव, मनीषा पालव, शोभना जोशी, उल्का वेंगुर्लेकर, प्रतिभा परब, लक्ष्मण परब, विवेक नाईक, रुपाली वेंगुर्लेकर, उल्का सातवेकर, अमिना कुन्नत, वर्षा सावंत, ललिता फाटक, साधना फाटक, जॉयसी कार्डोज, ब्रुदेश अरांऊज, शालिनी अणसूरकर, शैलेश सातार्डेकर, महेश राणे, जयेंद्र गावडे, राजन कांबळी, महेंद्र जाधव, विलास परब, संजू फर्नांडिस, दिंगबर आरोलकर, नरेंद्र नाईक, अमित परब, दीपक कांबळे, आनंद प्रभू, प्रशांत सावंत, संतोष पिंगुळकर, सुनील सावके, शाम केरकर, सूरज केरकर, गुरुनाथ तांडेल, नाना कासवकर, नीलेश भोसले, नीलेश गंगावणे, रेश्मा वरसकर, सारिका पाटील, संतोष परब, संतोष गोरे, प्रभाकर देऊलकर, गंगाराम परब, रोहन रणभिसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुमन परब यांनी केले. सुधीर गावडे यांनी आभार मानले.
---
मनोरंजनात्मक खेळांचा समावेश
दुपारच्या सत्रात मनोरंजनात्मक खेळांमध्ये संगीत खर्ची, पोत्यात पाय घालून पळणे, लिंबू-चमचा, रस्सीखेच असे खेळ घेण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी बालमित्र होऊन या खेळांची मजा लुटली. प्रास्ताविकात राकेश परब यांनी या मेळाव्याची संकल्पना कशी पुढे कशी आली व पूर्ण झाली, याबद्दल माहिती दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63021 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top