चिपळूण-सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-सदर
चिपळूण-सदर

चिपळूण-सदर

sakal_logo
By

यापूर्वी २४ मे टु ३ वर सदर लागले
...
वेध वैद्यकीय विश्वाचा .........................लोगो
.....
-rat30p34.jpg
L25383
ः डॉ. सायली माधव
------------
इंट्रो
मासिक पाळी ही प्रत्येक स्त्रीची सामान्य व नैसर्गिक शरीरक्रिया आहे. आपल्या शरीरातील इतर अवयवांसारखं हेही प्रजनन अवयवांचं काम आहे. त्याला अशुभ किंवा वाईट समजणं चुकीचं आहे. जवळपास ८०० दशलक्षहून अधिक स्त्रिया आणि मुलींना रोज पाळी येते. त्यातील बऱ्याच जणींचे पाळीविषयी बरेच समज-गैरसमज आहे. कोविडसारख्या महामारीने त्यात आणखीनच भर पाडली आहे. सामाजिक कलंक आणि रुढी यांच्यामुळे अजूनही पाळी आलेल्या महिलांना/मुलींना वाळीत टाकल्यासारखी वागणूक, त्या चार दिवसांत दिली जाते.
- डॉ. सायली माधव, स्त्रीरोगतज्ञ लाईफकेअर हॉस्पिटल, चिपळूण
------------------------------------------
मासिक पाळी.. समज कमी गैरसमज जास्त

मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना योग्य सुविधा आणि योग्य मासिक पाळी स्वच्छतेविषयी शिक्षण दिले तर त्या चार दिवसांतही त्या तेवढ्याच जोमाने वर्गात, कामाच्या जागी आणि घरीही कार्यरत राहतील. तसेच बऱ्याच स्त्रिया अजूनही कापड स्वस्त असल्याने पॅड वापरत नाहीत. ज्यामुळे त्यांना जननमार्गाच्या बऱ्याच जंतूसंसर्गाचा धोका वाढतो. जागतिक पातळीवर युएसएआयडीएस (युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशल डेव्हलमेंट) सारख्या बऱ्याच संस्था स्त्रियांच्या आरोग्याविषयी तसेच पाळीविषयी आणि त्याच्या जागरुकतेविषयी कार्यरत आहे. शाळेमध्ये तसेच स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना पुरेशी जागा स्वच्छ, स्वच्छतागृह तसेच पाणी हे मुबलक प्रमाणात मिळणे गरजेचे आहे.
मासिक पाळीमध्ये घ्यायची खबरदारी
- कापड न वापरता नेहमी पॅडचा वापर करावा
- एक पॅड जास्त वेळेकरिता वापरू नये. दर सहा ते आठ तासाला बदलावे.
- वापरलेले पॅड नीट पेपरमध्ये गुंडाळून बंद कचरापेटीत टाकावे.
- पुरेशी विश्रांती आणि झोप घ्यावी, प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करावे
- मीठ, साखर, कॉफी, तिखट पदार्थ शक्यतो टाळावेत.
- मुबलक पाणी, आहारात फळे, पालेभाज्या, आलं, हळद, बदाम, काजू हवा
वयोमानानुसार तसेच वजनामध्ये बदल झाला किंवा शरीरात काही रासानिक बदल झाल्यावरही पाळीवर त्याचा परिणाम होतो. साधारणपणे पाळी वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापर्यंत सुरू होते. काही प्रकरणांमध्ये वयाच्या दहाव्या वर्षीदेखील पाळी येऊ शकते सोळा वर्षांनतर जेव्हा पाळी सुरू होते, त्याला डिलेड प्युबर्टी असे म्हणतात. जसे वय वाढते, तसे पाळीतही बदल होतात. पाळी साधारण वयाच्या ४५ ते ५० वर्षापर्यंत जाते, त्याला मेनोपॉज म्हणतात. जर पाळी ५० वर्षे वयापर्यंत गेली तर त्या डिलेड मेनोप़ॉज म्हणतात. जर पाळी ५० वर्षे वयापर्यंतही गेली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे तसेच पाळी जर वयाच्या दहा वर्षाच्या आतच आली तिथेही वेळीच स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्याची गरज असते.
अलीकडे मुलींना वयाच्या ११ ते १२ व्या वर्षी पाळी येते आणि त्यांना शाळेमध्ये किंवा घरामध्येही पाळीविषयी माहिती दिले जाणे अतिशय गरजेचे आहे. त्या दिवसांमध्ये स्वच्छता कशी राखायची, काय काळजी घ्यायची या संदर्भातही ज्ञान देणे गरजेचे आहे. नवीन शास्त्रापमाणे पाळीसाठी मेन्स्ट्रुअल कप वापरले जातात. कापड आणि पॅडपेक्षाही मेन्स्ट्रुअल कप्स अधिक फायदेशीर आहे. त्यामध्ये पाळीमध्ये होणाऱ्या इनफेक्शनचे प्रमाणही कमी आहे.टॅम्पॉन किंवा सॅनिटरी पॅड्सपेक्षा जास्त रक्त गोळा करण्याची या मेन्स्ट्रुअल कप्सची क्षमता असते; पण दर ठराविक कालावधीनंतर ते बाहेर काढून रक्ताचं विसर्जन करून ते स्वच्छ करणं गरजेचं असतं. मासिक पाळीदरम्यान पॅड तुलनेत मेंस्ट्रुअल कप खर्चिक असले तरी ही वन टाईम इन्वेस्टमेंट आहे, कारण हे कप पाच वर्ष वापरता येतात. पीरियड्समधे प्रत्येक स्त्रीच्या शरीरामधे हार्मोन्स बदल होत असतात.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63053 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top