
राजापूर ः 15 दिवसात दहा हजार भाविकांचे गंगास्नान
-rat30p29.jpg
L25376
ः राजापूर ः काशिकुंड.
...
-rat30p30.jpg
25377
ः मूळगंगा
...
-rat30p31.jpg
25378
ः गंगास्नानासाठी भाविकांनी केलेली गर्दी.
...
-rat30p32.jpg
25379
ः गायमुखाखाली स्नान करताना भाविक.
-----------------
दहा हजार जणांनी साधली गंगास्नानाची पर्वणी
उन्हाळे तीर्थक्षेत्री १५ दिवसांतील चित्र; केरळ, गुजरात, कर्नाटकातील पर्यटकांची हजेरी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० ः गेल्या दोन वर्षांमध्ये गंगामाईचे तालुक्यातील उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले असले तरी, कोरोना महामारीमुळे भाविकांना गंगास्नान करता आलेली नाही; मात्र, कोरोना महामारी कमी झाल्यानंतर आलेल्या गंगामाईच्या स्नानासाठी भाविकांची उन्हाळे तीर्थक्षेत्री पावले वळू लागली आहेत. गंगामाईच्या आगमनानंतर गेल्या १५ दिवसांत राज्यासह केरळ, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांतील सुमारे दहा हजारांहून अधिक भाविकांनी गंगास्नानाची पर्वणी साधली.
तीर्थक्षेत्री असलेल्या मूळगंगा, काशिकुंड, गायमुख यांच्यासह चौदा कुंडांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी आहे. गंगामाईचे आगमन झाल्याची बातमी कर्णोपकर्णी होताच राज्यासह परराज्यांतील भाविकांची पावले आपसूकच गंगातीर्थक्षेत्राकडे आता वळू लागली आहेत. गंगामाईच्या आगमनानंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यासह केरळ, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांतील सुमारे दहा हजारांहून अधिक भाविकांनी या ठिकाणी गंगास्नान केल्याची माहिती गंगा देवस्थानकडून देण्यात आली. गेल्या दोन दिवसांतील सुटीमुळे गंगातीर्थ भाविकांच्या उपस्थितीमुळे अधिकच फुलले आहे.
------------
चौकट
गंगाक्षेत्री दुकाने थाटण्याबाबत द्विधा
गंगामाईच्या आगमनानंतर गंगा तीर्थक्षेत्र परिसरामध्ये विविध प्रकारची दुकाने व्यापाऱ्यांकडून थाटली जातात. मात्र, गंगा तीर्थक्षेत्री भाविकांची संख्या दिवसागणिक वाढत जात असताना गंगा परिसरामध्ये नेहमीप्रमाणे अद्यापही व्यापाऱ्यांनी दुकाने थाटलेली नाहीत. पावसाळा तोंडावर असल्याने दुकाने थाटायची की नाही, याबाबत द्विधा मनःस्थितीमध्ये व्यापारी आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63059 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..