रत्नागिरी ः जिल्ह्यातील शहरी भागही हागणदारीमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः जिल्ह्यातील शहरी भागही हागणदारीमुक्त
रत्नागिरी ः जिल्ह्यातील शहरी भागही हागणदारीमुक्त

रत्नागिरी ः जिल्ह्यातील शहरी भागही हागणदारीमुक्त

sakal_logo
By

25407ः संग्रहीत
...
अभियान राबवले स्वच्छ भारत, शहरे झाली हागणदारीमुक्त

रत्नागिरी जिल्ह्यांचे यश; २ हजार २७२ वैयक्तिक शौचालय, आयुक्तांकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३०ः जिल्ह्यातील नगर पालिका, नगरपंचायतींना मिळालेल्या २ हजार २७२ उद्दिष्टांपैकी सर्व उद्दिष्ट पूर्ण झाले आहेत.२ हजार २७२ लाभार्थ्यांस शासनाच्या ''स्वच्छ भारत अभियान'' योजनेचा लाभ देऊन वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रती शौचालय १७ हजार अनुदान देण्यात आले आहे. याचेच फळस्वरूप म्हणजेच केंद्र शासनाच्या समितीमार्फत झालेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील शहरी भाग हागणदारीमुक्त झाला आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) या उपक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावणी झाली आहे, असे जिल्हा सहआयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला कळवले आहे.
देशातील सर्व शहरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील सर्व नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने २ ऑक्टोबर २०१४ ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मतिथीनिमित्त ''स्वच्छ भारत अभियान (नागरी)'' या उपक्रमाची घोषणा केली. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील ज्या कुटुंबांकडे शौचालयांची सुविधा उपलब्ध नाही, अशा कुटुंबांना वैयक्तिक अथवा सामुदायिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन शहरे हागणदारीमुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अंतर्गत शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून शहरे स्वच्छ करणे या दोन प्रमुख बाबींचा स्वच्छ भारत अभियानामध्ये समावेश आहे.
शहर हागणदारीमुक्त करण्याच्यादृष्टीने ज्या कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने ते उघड्यावर शौचास जात होते. जिल्ह्यातील असे २ हजार २७२ इतके वैयक्तिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट शहरी भागात निश्चित करण्यात आले होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी केंद्र शासनाकडून ४ हजार प्रती लाभार्थी, राज्य शासनाकडून ८ हजार प्रती लाभार्थी असे एकूण १२ हजार प्रती लाभार्थी अनुदान देण्यात येते. तर, नगर पालिका, नगरपंचायतीमार्फत ५ हजार प्रती लाभार्थी इतके अनुदान देण्यात येत आहे.
...
चौकट
१७ हजार इतके प्रती शौचालय अनुदान
रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थ्यास वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी १७ हजार इतके प्रती शौचालय अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतींना मिळालेल्या एकूण २ हजार २७२ उद्दिष्ट होते. पैकी सर्व उद्दिष्ट पूर्ण केले असून २ हजार २७२ लाभार्थ्यांस शासनाच्या ''स्वच्छ भारत अभियान'' या योजनेचा लाभ देऊन वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.
..
ग्राफ करावा
..
एक नजर..
वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान
केंद्र शासनाकडून प्रती लाभार्थीः ४ हजार
राज्य शासनाकडून प्रती लाभार्थीः ८ हजार
एकूण प्रती लाभार्थी अनुदान ः १२ हजार
नगर पालिका, नगरपंचायतीमार्फतः ५ हजार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63066 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top