खेड ः गृहरक्षक दलामार्फत जगबुडी नदीमध्ये आपत्तीव्यवस्थापन समितीचे प्रात्यक्षिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः गृहरक्षक दलामार्फत जगबुडी नदीमध्ये आपत्तीव्यवस्थापन समितीचे प्रात्यक्षिक
खेड ः गृहरक्षक दलामार्फत जगबुडी नदीमध्ये आपत्तीव्यवस्थापन समितीचे प्रात्यक्षिक

खेड ः गृहरक्षक दलामार्फत जगबुडी नदीमध्ये आपत्तीव्यवस्थापन समितीचे प्रात्यक्षिक

sakal_logo
By

-rat30p37.jpg
L25382
खेड ः जगबुडी नदीत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक दाखवताना गृहरक्षक दलाचे जवान.
-----------------
जगबुडीत आपत्तीची प्रात्यक्षिक
खेड, ता. ३० ः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या जवानांना पूर परिस्थितीत कशाप्रकारे मदतकार्य आणि बचावकार्य करावे, याचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण जगबुडी नदीत गृहरक्षक दलातर्फे देण्यात आले. प्रशिक्षणात आपल्या परिसरातील वस्तूंच्या आधारे कशा प्रकारे महापुरात आपण आपला बचाव करू शकतो, याचे मार्गदर्शन केले. महापूर, ढगफुटीच्या काळात होमगार्ड्स, पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांनी कशा प्रकारे मदतकार्य करावे याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, केळीची खोडे, बांबू अथवा लाकडांपासून तराफे कसे बनवायचे आणि आपला बचाव कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्याचबरोबर स्पीडबोटीने पूरपरिस्थितीत कशा प्रकारे मदतकार्य करावे, याचे प्रात्यक्षिक गृहरक्षक दलाच्या, पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना अनुभवी प्रशिक्षकांसह देण्यात आले. शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर, गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक अधिकारी सचिन कडू, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63079 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top