तोंडवली-बावशी ग्रामपंचायत विरोधात 6 जूनला उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोंडवली-बावशी ग्रामपंचायत
विरोधात 6 जूनला उपोषण
तोंडवली-बावशी ग्रामपंचायत विरोधात 6 जूनला उपोषण

तोंडवली-बावशी ग्रामपंचायत विरोधात 6 जूनला उपोषण

sakal_logo
By

तोंडवली-बावशी ग्रामपंचायत
विरोधात ६ जूनला उपोषण
ओरोस, ता. ३० ः तोंडवली-बावशी (ता. कणकवली) ग्रामपंचायत विरोधात येथील पुंडलिक आत्माराम मर्ये व ज्ञानेश्वर विठ्ठल मर्ये हे कुटुंबासह ६ जून सकाळी साडेदहापासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना दिले आहे.
निवेदनात मर्ये यांनी म्हटले आहे की, तोंडवली- बावशी ग्रामपंचायतीने नमुना नंबर २३ ला रस्ता नोंद करताना मृतांचे संमतीपत्र तयार केले आहे. खोट्या पद्धतीने नमुना नंबर २३ ला नोंद करीत रस्ता करून घेतला आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीची चौकशी जाणीवपूर्वक केलेली नाही. संबंधित जमिनीबाबत न्यायालयात वाद सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असताना व यास्तरावरून ग्रामपंचायतीने संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश असताना त्याला केराची टोपली दाखविली. या अनुषंगाने उपोषण केले असता गटविकास अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत २३ नंबरला झालेली नोंद रद्द करण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे आम्ही उपोषण थांबविले होते. त्यामुळे ही नोंद रद्द होत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण करणार आहे. तसेच खोटे संमतीपत्र तयार करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा. न्यायालयीन वाद सुरू असल्याने ग्रामसेवकांनी २३ नंबरमध्ये ढवळाढवळ करू नये. तसेच रस्त्याचे काम करू नये. ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करावी. सरपंचांनाही पदच्युत करावे, अशा मागण्या निवेदनात आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63082 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top