बंदला तोंड देण्यास एसटीची पर्यायी व्यवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंदला तोंड देण्यास एसटीची पर्यायी व्यवस्था
बंदला तोंड देण्यास एसटीची पर्यायी व्यवस्था

बंदला तोंड देण्यास एसटीची पर्यायी व्यवस्था

sakal_logo
By

बातमी क्र. 40 (पान 3 साठी)

बंदला तोंड देण्यास एसटीची पर्यायी व्यवस्था

आज इंधन खरेदी बंद ;दिवसाला लागते साठ हजार लिटर डिझेल

रत्नागिरी, ता. ३० : भारत पेट्रोलियम कंपनीने सर्वच डेपोंवरील इंधन पुरवठा बंद केल्याने सध्य पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासत आहे. कंपन्यांनी पेमेट्सच्या टर्म अचानक बदलल्याने हा तुटवडा भासत आहे. त्यात उद्या (ता. ३१) इंधन खरेदी न करण्याचा निर्णय फामपेडाने घेतला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्याच्या एसटी वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. मात्र एसटीला दिवसाला लागणारे साठ हजार लिटर डिझेल आयओसी, एचपीसीएल कंपन्यांच्या पर्यायी पंपांवरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग आणि पंप चालकांची एसटी प्रशासनाने भेट घेतली असून उद्या शंभर टक्के एसटी वाहतुक सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे.
राज्यात सध्या पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासू लागला आहे. विशेष म्हणजे भारत पेट्रोलियमचे सर्व टेपोंमध्ये इंधनाचा तुटवडा आहे. कंपन्यांनी पेमेंट्सच्या टर्म अचानक बदलल्या आहेत. यापूर्वी सकाळी माल मिळाला की त्याच दिवशी संध्याकाळी पेमेट होत होत. आता कंपन्या अॅडव्हान्स पैसे मागत आहेत. त्यातही पैसे देऊन सुद्धा भारत पेट्रोलियमनमध्ये माल मिळत नाही. ऑईल कंपन्यांकडुन अचानक इंधनाचा तुटवडा सुरू झाला आहे.
कंपन्यांच्या या धोरणाच्या विरोधात उद्या (ता. ३१) फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशने (फामपेडा) एक दिवस इंधन खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन तुटवड्याचा थेट परिणाम एसटी वाहतुकीवर पडण्याची शक्यता आहे. भारत पेट्रोलियमच्या अनेक पेट्रोल पंपांवरून एसटी गाड्यांना डिझेल भरतात. एसटीला दिवसाला सातशे गाड्यांसाठी साठ हजार डिझेल लागते. यातून पावणे दोन लाख किलोमीटरच्या फेऱ्या होतात. मात्र उद्या डिझेल तुटवड्यामुळे एसटी फेऱ्यांवर परिणाम होण्याची शक्य प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आयओसी, एचपीसीएल या कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर एसटीसाठी डिझेल खरेदी केली जाणार आहे.
-----------
चौकट-
डिझेल भरण्यास विलंबाने वेळापत्रकावर परिणाम

इंधन टंचाईचा एसटी फेऱ्यांवर चांगलाच परिणाम झाला आहे. अनेक पेट्रोल पंप बंद असल्याने मोजक्या पंपांवर डिझेल भरण्यासाठी एसटीच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे एसटीचे वेळापत्रक काहीसे कोलमडले. डिझेल भरण्यासाठी विलंब होत असल्याने अनेक गाड्या उशिरा सुटल्या. प्रवासी वर्गाची त्यामुळे गैरसोय झाली. जिल्ह्यातील अनेक आगारांमधील वेळापत्रक डिझेल भरण्यास विलंब झाल्याने कोलमडले होते. एसटीने त्याला दुजोरा दिला.
---------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63140 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top