हर्णै ः मच्छीमार हंगाम संपला,नौका किनाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णै ः मच्छीमार हंगाम संपला,नौका किनाऱ्यावर
हर्णै ः मच्छीमार हंगाम संपला,नौका किनाऱ्यावर

हर्णै ः मच्छीमार हंगाम संपला,नौका किनाऱ्यावर

sakal_logo
By

-rat30p39.jpg, rat30p40.jpg
L25434, 25433
हर्णै ः आंजर्ले खाडीत शाकारण्यासाठी दाखल झालेल्या नौका. (राधेश लिंगायत ः सकाळ छायाचित्रसेवा)

मच्छीमारी नौका किनारी, हंगाम संपला!

सुरक्षित बंदरात नौका शाकारण्याची तयारी जोरदार सुरू

हर्णै, ता. ३० ः मासेमारीवर १ जूनपासून शासनाकडून बंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे हर्णै बंदरातील मासेमारी नौका समुद्राबाहेर काढण्यासाठी मच्छीमारांची धावपळ सुरू आहे. मासेमारीसाठी समुद्रात उतरलेल्यांपैकी ४० टक्के नौका किनाऱ्यावर घेऊन शाकारण्याची तयारी जोरदार सुरू आहे. ४० टक्के नौका होळी सणानंतरच आंजर्ले खाडीत उभ्या ठेवल्या आहेत. त्यांची देखील शाकारणी सुरू आहे. उर्वरित २० टक्के नौका जयगड खाडीत आहेत. मंगळवारपर्यंत (ता. ३१) सर्वच नौका किनाऱ्यावर शाकारलेल्या असतील, असे मच्छीमारांनी सांगितले.
हर्णै बंदरात साधारणपणे ९०० ते १००० परवानाधारक मासेमारी नौका आहेत. बंदरातील बोटींची जेटी नसल्याने नौका सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी मासेमारांनी आपल्या बोटी समुद्राबाहेर काढण्याची लगबग सुरू केली आहे. हर्णै बंदरात जेटीच्या अभावामुळे हर्णै बंदर, पाजपंढरी बंदर येथे कमी प्रमाणात आणि बहुतांशी नौका जयगड, आंजर्ले, दाभोळ आदी खाड्यांमध्ये सुरक्षित ठेवून शाकारण्याची तयारी सुरू आहे.
ट्रॅक्टरच्या साह्याने या नौका बाहेर काढल्या जात असून, दोन दिवसांत नौका बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. गेल्या वर्षी मासळी हंगाम जेमतेमच होता. मच्छीमारी तोट्यातच आहे. बदलत्या हवामानासह फास्टर आणि एलईडी लॉईटद्वारे होणारी मच्छीमारी पारंपरिक मच्छीमारांची कायमचीच डोकेदुखी ठरली आहे. तसेच वातावरण, वादळ यामुळे मासेमारीतील निम्म्याहून अधिक काळ वाया गेला. त्यात मच्छीच्या दुष्काळाची भर पडली.
-----------------------------------------------------------------
कोट
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीच्या डिझेल दरवाढीने आमचे तोंड फोडले. आठ दिवसांसाठी मासेमारीला जाण्यासाठी एक हजार लिटर डिझेल भरायचे असेल, तर किमान लाख ते सव्वा लाख रुपयांची व्यवस्था करायला लागत होती. डिझेलचे पैसेही मिळालेल्या मासळीतून वसूल होत नाहीत. सगळा व्यवसाय तोट्यातच आहे.
- अनंत चोगले, मच्छीमार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63141 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top