रत्नागिरी-जिल्ह्यातील दोघे लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-जिल्ह्यातील दोघे लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण
रत्नागिरी-जिल्ह्यातील दोघे लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

रत्नागिरी-जिल्ह्यातील दोघे लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

sakal_logo
By

-rat30p44.jpg-
25473
अक्षय महाडिक

-rat30p45.jpg-
25475
चेतन पंदेरे

जिल्ह्यातील दोघांचा
‘युपीएससी’त झेंडा

खेडचा अक्षय महाडिक, रत्नागिरीचा चेतन पंदेरे

रत्नागिरी/खेड, ता. ३० : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि रत्नागिरी येथील तरुणांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तम यश मिळवले आहे. खेड येथील अक्षय महाडिक याने २१२ वा तर रत्नागिरीतील चेतन पंदेरेने ४१६ वा क्रमांक मिळवला. कोकणातील मुले स्पर्धा परीक्षांकडे वळत नाहीत णि त्यात यशही कमी मिळते, असे म्हटले जाते. या दोघांच्या यशाने हा समज दूर होण्यास मदत होणार आहे.
खेड तालुक्याचा सुपुत्र अक्षय संजय महाडिक याने सोमवारी जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात २१२ वा क्रमांक पटकावला आहे. अक्षय हा येथील ज्ञानदीप विद्यालयातील माजी विद्यार्थी असून त्याच्या यशाबद्दल माहिती मिळताच ज्ञानदीप विद्यालयातर्फे स्थाचालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी आंनद व्यक्त केला.
रत्नागिरीतील चेतन पंदेरे याने अभियांत्रिकी पदवी मिळवल्यानंतर या परीक्षेचा अभ्यास केला. त्याला आयपीएस केडरकडे जायचे आहे, असे त्याने सांगितले. अभियंता झाल्यानंतर त्या क्षेत्रात नोकरी करण्याऐवजी २०१८ पासून त्याने नेटाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी अभ्यास केला.
खेड तालुक्यातील सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या अक्षयची आई नेहा संजय महाडीक खेडमधील नातूनगर येथील जिल्हापरिषद शाळेत प्राथमिक क्षिका असून व वडील संजय महाडीक हे कृषी विभागात कार्यरत आहेत. त्याचे मूळगाव दापोली तालुक्यातील माटवण हे आहे. अक्षयने दहावी व बारावी विज्ञानपर्यंतचे शिक्षण ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या विद्यालयात पूर्ण केले आहे. त्याच्या खेडमधील शैक्षणिक वाटचालीत अनेक शिष्यवृत्ती परीक्षा व शालेय स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी त्याने उच्च शिक्षण नेरुळ येथील महाविद्यालयात घेताना केली. त्याने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत २१२, तर राज्य गुणवत्ता यादीत २८ वा क्रमांक पटकावला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63190 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top