
पान एक-दुचाकी अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू
दुचाकीच्या अपघातात
व्यापाऱ्याचा मृत्यू
मृत मुंबईतील; तिथवलीतील घटना
सकाळ वृत्तसेवा,
वैभववाडी, ता. ३० ः गोवंडी (मुंबई) येथील आंबा व्यापारी महमदउमर याकुब शेख (वय ४९) या व्यापाऱ्याचा तिथवली येथे झालेल्या दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी चारच्या सुमारास झाला. दुचाकी चालवित असताना हद्यविकाराचा झटका आल्याने हा अपघात झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
गोवंडी बैंगनवाडी, शिवाजीनगर येथील श्री. शेख हे आंब्याचे व्यापारी होते. राजापूर तालुक्यातील पाचल, रायपाटणसह विविध भागातील आंबे खरेदी करून त्याची मुंबईतील व्यापाऱ्यांना ते विक्री करतात. आंब्याच्या खरेदीसाठीच ते मुंबईहुन दुचाकीने (क्रमांक एमएम ०३ बीक्यू ०७७३) गावी आले होते. दरम्यान, आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील तिथवली येथे रस्त्याकडेला ते मृतावस्थेत आढळुन आले. त्यांच्या दोन्ही पायांवर दुचाकी पडली होती. ही माहिती काही वाहनचालकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील, पोलिस कॉन्स्टेबल हरिष जायभाय, संदीप कांबळे, संदीप राठोड हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृताची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. श्री. शेख यांच्याकडे असलेल्या मोबाईलवरून त्यांचा भाऊ अल्ताब याकुब शेख यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर विच्छेदनासाठी मृतदेह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63195 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..