आमदार नाईक यांच्याकडून कालेली सरपंचाचे अभिनंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार नाईक यांच्याकडून 
कालेली सरपंचाचे अभिनंदन
आमदार नाईक यांच्याकडून कालेली सरपंचाचे अभिनंदन

आमदार नाईक यांच्याकडून कालेली सरपंचाचे अभिनंदन

sakal_logo
By

25524
कुडाळ ः कालेली ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सानिका परब यांचे अभिनंदन करताना आमदार वैभव नाईक, अतुल बंगे आदी.

आमदार नाईक यांच्याकडून
कालेली सरपंचाचे अभिनंदन
कुडाळ, ता. ३१ ः माणगाव खोऱ्यातील कालेली ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सौ. सानिका परब यांची नुकतीच निवड झाली. यानिमित्त त्यांनी येथील शिवसेना कार्यालयात आमदार वैभव नाईक यांची भेट घेतली. यावेळी आमदार नाईक यांनी अभिनंदन त्यांचे केले. सौ. परब यांनी आपल्या नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी आमदार नाईक यांनी पाच लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला. याबाबत सरपंच सौ. परब यांनी आमदार नाईक यांचे आभार मानले.
यावेळी आमदार नाईक यांनी कालेली गावामधे विकासकामांसाठी निधी अजिबात कमी पडणार नाही. आमदार म्हणून मी सदैव पाठीशी, असे सांगितले. कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, ग्रामपंचायत सदस्या आरोही चव्हाण, कालेली शिवसेना शाखाप्रमुख श्री. दाजी पडकील, कालेली शिवसेना पदाधिकारी प्रशांत चव्हाण, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अतुल बंगे, राजु गवंडे, नितीन सावंत, संतोष अडुरकर, शोएब खुल्ली, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, स्वप्नील शिंदे, सुशील चिंदरकर, बंड्या खोत, सतीश कुडाळकर व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63259 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top