
‘पाट पंचक्रोशी’ची निवडणूक उत्साहात
25526
पाट ः एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशीचे नूतन संचालक मंडळ.
‘पाट पंचक्रोशी’ची निवडणूक उत्साहात
अध्यक्षपदी डॉ. विलास देसाई; दिगंबर सामंत उपाध्यक्षपदी
कुडाळ, ता. ३१ ः एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट पंचक्रोशीची २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी नूतन संचालक मंडळाची निवडणूक झाली. यात विद्यमान संचालक पुरस्कृत डॉ. विलास देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने भरघोस मतांनी विजय मिळवला. मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. विलास देसाई यांची निवड झाली.
९ एप्रिलला जाहीर झालेल्या अधिसूचनांप्रमाणे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. २९ मे रोजी सायंकाळी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निवडणूक निर्णय जाहीर करून सभेची मंजुरी घेण्यात आली. २०१३ नंतर नऊ वर्षांनी निवडणूक घेण्यात आल्यामुळे सभासदांमध्ये औत्सुक्य निर्माण झाले होते. अध्यक्षपदी डॉ. विलास देसाई यांची, तर उपाध्यक्षपदी दिगंबर सामंत यांची निवड झाली.
यावेळी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाचा अभिनंदन ठराव करण्यात आला. प्रमोद ठाकूर, संजय पाटकर, मंगेश कोळमकर, सुभाष चौधरी, दिवा परब आदींनी सकारात्मक ठराव मांडले. गेली बारा वर्षे कार्याध्यक्ष म्हणून उत्तम काम केलेल्या रामचंद्र रेडकर गुरुजींचा सत्कार करण्यात आला. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटकर यांचाही सत्कार केला. संस्थेला आर्थिक साहाय्य करणारे (कै.) बा. पाटील, विद्यमान अध्यक्ष डॉ. देसाई, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, अशोक सरनाईक (अमेरिका), सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, अरविंद पाटील, गुरुनाथ पाटकर, शिवराम चव्हाण, अच्युत प्रभू, अण्णा ठाकुर, भगीरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर यांनी अभिनंदन केले. सभेत अशोक तेंडोलकर, उदय फणसेकर, डॉ. मेतर, अंकुश निवतकर, मदन परब, बाबना परब, दिलीप पाटकर, स्मिता शिरपुटे, सुलक्षणा रेडकर, सौ. रेडकर, विजय मेस्त्री, विनया मेस्त्री, पाट हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. कोरे, माड्याचीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ठाकुर, प्रा. सौ. साळसकर, इंग्रजी मीडियमचे तुषार आंबेरकर व संस्था सदस्य उपस्थित होते. विकास गवंडे यांनी आभार मानले.
--
विजयी उमेदवार
डॉ. विलास देसाई, दिगंबर सामंत, गणपत नार्वेकर, समाधान परब, दीपक पाटकर, राजेश सामंत, सुधीर ठाकुर, नारायण तळावडेकर, संजय ठाकुर, देवदत्त साळगावकर, अवधूत रेगे, सुभाष चौधरी. मुंबई साहाय्यक मंडळावर गुरुनाथ पाटकर, अजित ठाकुर, सुहास आजगावकर, शिवराम चव्हाण, विलास पाटील, मंगेश नाईक यांची बिनविरोध निवड झाली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63262 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..