उल्हास रणसिंग यांना लोककला पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हास रणसिंग यांना
लोककला पुरस्कार
उल्हास रणसिंग यांना लोककला पुरस्कार

उल्हास रणसिंग यांना लोककला पुरस्कार

sakal_logo
By

25527
सिंधुदुर्ग ः उल्हास रणसिंग यांना पुरस्काराने सन्मानित करताना मान्यवर.

उल्हास रणसिंग यांना
लोककला पुरस्कार
सिंधुदूर्गनगरी, ता. ३१ ः पंचशील ट्रस्ट एटिकेट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र वैभव गौरव लोककला पुरस्काराने उल्हास रणसिंग यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यातील गोंधळी ही पारंपरिक लोककला म्हणून प्रसिद्ध आहे. या कलेचे सादरीकरण करण्यामध्ये श्री. रणसिंग यांनी आतापर्यंत अनेक कला सादर केल्या आहेत. कट्टा (ता.मालवण) येथील रणसिंग हे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा सुकळवाड येथे कार्यरत आहे. विविध क्षेत्रात स्वबळावर कार्यरत राहून नवीन लोककलेच्या माध्यमातून उपक्रम सादर करणे हा त्यांचा हातखंडा आहे. या कलेच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी विविध प्रकारे गोंधळ लोककला सादर केली. यासाठी त्यांना नुकताच सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तीचे जादूगार प्रेम आनंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. गोंधळ कलेच्या माध्यमातून रणसिंग यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात राष्ट्रीय भिमज्योत सामाजिक परिषदेचा भिम ज्योती पुरस्कार, आशियाई कला पर्यटन साहित्य मानव सेवा परिषदेच्या बेस्ट सिटीझन ऑफ इंडिया अवॉर्ड, लोक मुद्रा कला साहित्य सांस्कृतिक संमेलन आदींसह विविध क्षेत्रात त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सिंधूवैभव लोककला पुरस्कार मिळाल्याबद्दल रणसिंग यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63264 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top