संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat31p11.jpg ः देवरूख ः देवरूख न्यू इंग्लिश स्कूलचे 1975 सालचे दहावी बॅचचे विद्यार्थी.
L25541
....
४७ वर्षानंतर ते एकत्र आले
भूतकाळातील आठवणीत रमले
साडवली ः देवरूख न्यू इंग्लिश स्कूलच्या जुन्या अकरावी मॅट्रिकचे विद्यार्थी ४७ वर्षानंतर एकत्र आले आणि देवरूख येथे अनोखे गेट टुगेदर झाले. सध्या आजी-आजोबा या भूमिकेत असलेले हे नागरिक चक्क लहान मूल बनून त्या काळच्या आठवणीत रमून गेले. न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक सु. ज. जोशी, ए. डी. जोशी, सौदामिनी जोशी, शामकांत अळवणी, नवरे सर या शिक्षकांना गौरवण्यात आले. तुमच्यामुळे आम्ही घडलो, या भावना व्यक्त करण्यात आल्या. या वेळी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, सचिव शिरीष फाटक, मुख्याध्यापिका माया गोखले यांचाही सत्कार करून या विद्यार्थ्यांनी ५१ हजाराची देणगी शाळेला दिली.
------------
rat31p12.jpg
L25542
ः साखरपा ः अधिकार्‍यांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी बी. एन. पाटील.
....
आरोग्य केंद्रास जिल्हाधिकाऱ्‍यांची भेट
साखरपा ः जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी नुकतीच साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. केंद्राचा दर्जा वाढवण्यासाठी ही भेट महत्वाची ठरणार आहे. हे केंद्र हे अतिमहत्वाचे आरोग्य केंद्र म्हणून मानले जाते. या केंद्राचा दर्जा वाढावा आणि त्याचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर व्हावे, अशी मागणी गेली अनेक वर्षे जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पाटील यांनी नुकतीच दिलेली भेट महत्वाची मानली जात आहे. पाटील यांच्याबरोबर तहसीलदार सुहास थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी शेरॉन सोनावणे, जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले, वैद्यकीय अधिकारी उमा त्रिभुवणे, आरोग्य सहाय्यक दत्तात्रय भस्मे, विनायक सुर्वे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.
------------
खालील बातमी सं. मध्ये घेवू नये.
rat31p13.jpg
L25543
ः मंडणगड ः तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांना शुभेच्छा देताना मंडणगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पवार, उपाध्यक्ष प्रशांत सुर्वे, पत्रकार सचिन माळी व सुबोध दरिपकर.
....
तहसीलदार वेंगुर्लेकर सेवानिवृत्त
मंडणगड ः निसर्ग चक्रीवादळ व कोव्हिड महामारीच्या संकटाच्या कालावधीत मंडणगड तालुक्याच्या जनतेसाठी उत्तम काम करून तालुकावासीयांच्या सदैव स्मरणात असलेले तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर मंगळवारी (ता. ३१) मे रोजी महसूल विभागाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पुढील वाटचालीस तहसील कार्यालयातील कर्मचारी व तालुकावासीयांनी शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात सेवा बजावणाऱ्या वेंगुर्लेकर यांनी अव्वल कारकून ते तहसीलदार अशा विविध पदांवर समर्थपणे काम केले. त्यांनी एकूण ३७ वर्षे ५ महिने इतक्या कालावधीत एक प्रशासकीय अधिकारी म्हणून शासनाची व समाजाची सेवा केली. गेली तीन वर्षे ते मंडणगड तालुक्यात तहसीलदार या पदावर कार्यरत होते. या कालावधीत तालुक्याने निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते वादळ याचबरोबर कोरोना महामारी या संकटाचा सामना केला. कोरोना महामारीत तालुक्यात रोगाने मृत्य व रोगलागणीचे प्रमाण अंत्यत कमी राहिले. याशिवाय वेळोवेळीच्या लॉकडाउनची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात वेंगुर्लेकर यांनी निर्णायक भूमिका घेतली होती. निसर्ग चक्रीवादळाने तालुकावासीयांचे अतोनात नुकसान झाले. शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भऱपाईपासून एकही तालुकावासीय वंचित राहू नये, याकरिता वेंगुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने दिवसरात्र मेहनत घेत उल्लेखनीय कामगिरी केली. तालुक्यात प्रथमच पार पडलेला राष्ट्रपती यांचा दौरा यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावली. जनमानसात आपला वेगळा ठसा त्यांनी उमटवला.
------
Rat31p14.jpg
2L25544
ः मुंबई ः भैरवनाथ क्रिकेट संघ रातांबेवाडी पटकावलेल्या प्रथम क्रमांकासह.
....
रातांबेवाडीने जिंकला प्रथम क्रमांकाचा चषक
मंडणगड ः तालुक्यातील भैरवनाथ क्रिकेट संघ रातांबेवाडीने संघातील लाडका खेळाडू (कै.) ओमकार म्हाब्दी याला समर्पित करण्यासाठी जिद्दीने प्रथम क्रमांक पटकावत पहिले बक्षीस पटकावले. गेल्या २ वर्षापासून भैरवनाथ क्रिकेट संघाची इच्छा होती की, संघाने आपल्या ओमकारसाठी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकावी. रविवारी (ता.२९) मे रोजी मुंबई येथे पार पडलेल्या ब्रदर्स स्पर्धेत आपले स्वप्न साकार करत हे यश ओमकार याला समर्पित केले.

-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63354 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top