रत्नागिरी ः प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत जिल्हा अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत जिल्हा अव्वल
रत्नागिरी ः प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत जिल्हा अव्वल

रत्नागिरी ः प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत जिल्हा अव्वल

sakal_logo
By

राज्यस्तरीय कार्यमूल्यांकनः लोगो
...
प्रधानमंत्री मातृवंदनमध्ये जिल्हा अव्वल

१३ कोटी ५१ लाख खात्यांत जमा; ३१, ८५७ मातांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ ः प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची १०७ टक्के उद्दिष्टपूर्ती तसेच राज्यस्तरीय कार्यमूल्यांकन क्रमवारीत मे २०२२ मध्ये रत्नागिरी जिल्ह्याने अव्वल श्रेणी प्राप्त केली आहे. जिल्ह्यामध्ये राज्य स्तरावरून देण्यात आलेले मातांचे २९ हजार ६०६ उद्दिष्टांपेक्षा एकूण ३१ हजार ८५७ मातांना एकूण १३ कोटी ५१ लाख ९८ हजार लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना ही नवीन योजना संपूर्ण देशात १ जानेवारी २०१७ पासून सुरू केली. योजना केंद्र पुरस्कृत असून या योजनेमध्ये शासनाचा ६० टक्के व राज्यशासनाचा ४० टक्के सहभाग आहे. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्याराष्टीने गर्भवती महिला स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, यासाठी प्रयत्न करणे. जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट येऊन तो नियंत्रणात राहावा, प्रसूतीपूर्व प्रसूतीपश्चात महिलेला आपली बुडीत मजुरी मिळावी, यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना कार्यान्वित केली आहे.
योजना उत्तमरितीने राबवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच आरोग्य संस्थेच्या परिसरामध्ये पोस्टर्स, बॅनर्स, वर्तमानपत्रे व रेडिओ प्रक्षेपणाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक/सहाय्यिका, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा यांचा सहभाग घेण्यात येतो.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राज्य स्तरावरून देण्यात आलेले मातांचे २९ हजार ६०६ उद्दिष्टांपेक्षा एकूण ३१ हजार ८५७ मातांना एकूण १३ कोटी ५१ लाख ९८ हजार लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोविड साथीच्या लॉकडाउन काळातही व नागरिकांचा तसेच पात्र मातांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली.
..
एक नजर..
मातांची संख्याः ३१ हजार ८५७
लाभार्थीच्या खात्यात जमाः १३ कोटी ५१ लाख ९८ हजार
..
चौकट
मातांना रकम तीन टप्प्यांत जमा
शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत (शासकीय रुग्णालये) नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस तिच्या पहिल्या अपत्याचा एकदाच लाभ घेता येणार आहे. लाभाची रक्कम ५ हजार आहे. चैतनासह मातृत्व रजा मिळवणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही; मात्र लाभार्थी गर्भवती महिलेस खाली दर्शवल्याप्रमाणे ५ हजार रू. बँक सलग्न खात्यात किंवा पोस्ट खात्यात (DBT Through PFMS) द्वारे समाजातील सर्व स्तरातील मातांना तीन टप्प्यांत जमा केली जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63356 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top