वासुदेव नाईक सावंतवाडीचे गटविकास अधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वासुदेव नाईक सावंतवाडीचे गटविकास अधिकारी
वासुदेव नाईक सावंतवाडीचे गटविकास अधिकारी

वासुदेव नाईक सावंतवाडीचे गटविकास अधिकारी

sakal_logo
By

सावंतवाडीचे गटविकास
अधिकारी वासुदेव नाईक
ओरोस, ता. ३१ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे साहाय्यक गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांना शासनाने गटविकास अधिकारी वर्ग १ या पदावर बढती दिली आहे. बढतीने त्यांची सावंतवाडी पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या गटविकास अधिकारी या पदावर नियुक्ती दिली आहे.
श्री. नाईक हे थेट विस्तार अधिकारी या पदावर प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना साहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाली होती. या काळात त्यांनी सावंतवाडी पंचायत समितीत साहाय्यक गटविकास अधिकारी तसेच प्रभारी गटविकास अधिकारी या पदावर यशस्वी काम केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून सुद्धा यशस्वी काम केले आहे. सध्या ते जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या साहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर कार्यरत होते. शासनाने सोमवारी राज्यातील ७४ साहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना गटविकास अधिकारी वर्ग १ या पदावर बढती दिली आहे. यात त्यांचा समावेश असून, त्यांना सावंतवाडी गटविकास अधिकारी या रिक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे
--
मालवण गटविकास अधिकारीपदी गुजर
जे. पी. जाधव यांची रत्नागिरी पंचायत समिती गटविकास अधिकारी या पदावर बदली झाल्यानंतर रिक्त असलेल्या मालवण गटविकास अधिकारी या पदावर पुणे जिल्ह्यातील हवेली पंचायत समितीचे साहाय्यक गटविकास अधिकारी ए. आर. गुजर यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता मालवण पंचायत समितीला कायमस्वरुपी गटविकास अधिकारी मिळाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63360 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top