
रत्नागिरी- दादर पॅसेंजर पूर्ववत करा
rat31p15.jpg
L25545
ः रत्नागिरी ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देताना सचिन वहाळकर. सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, प्रदेश सदस्य अॅड. बाबा परुळेकर, शहराध्यक्ष सचिन वहाळकर.
....
रत्नागिरी- दादर पॅसेंजर दादरपर्यंत हवी
मंत्री दानवे यांना मागणीचे निवेदन; २२ वर्षांनंतर बदल कशासाठी?
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ ः रत्नागिरी- दादर पॅसेंजर (५-१०४) ही गाडी पुन्हा दादरपर्यंत नेण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
रेल्वेमंत्री दानवे सोमवारी (ता. ३०) रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्या वेळी हे निवेदन देण्यात आले. याबाबत वहाळकर यांनी सांगितले की, रामभाऊ नाईक केंद्रीय रेल्वेमंत्री असताना गाडी सुरू केली. गेली २२ वर्षे ती सुरू आहे. गाडी सकाळी रत्नागिरी येथून सुटून दुपारी दादर स्थानकापर्यंत जाऊन पुन्हा दादर ते रत्नागिरी (५-१०३) असा परतीचा प्रवास करून रत्नागिरी स्थानकात परत येत असे. कोरोना कालावधीत सर्व रेल्वेगाड्या बंद झाल्यामुळे ही गाडीही सुमारे दीड वर्ष बंद होती. ही सुरू झाल्यानंतर रत्नागिरी ते दादर अशी न धावता, केवळ दिवा स्थानकापर्यंतच सध्या जात आहे. परतीच्या प्रवासासाठी दिवा स्थानकातून सुटत आहे. हा बदल अनपेक्षित असून कोणतेही कारण न देता मध्यरेल्वेने केलेला आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असून, दादर, अंधेरी, बोरिवली या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना दिवा येथे उतरून पुढे जाणे हे त्रासदायक तसेच जिकिरीचे होत आहे. या गाडीतून मोठ्या प्रमाणावर रत्नागिरी जिल्ह्यातील कष्टकरी व त्यांचे कुटुंबीय, तसेच मुंबई येथे असणारे चाकरमानी हे तिकीटदर कमी असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. दिवा स्थानकापर्यंतच गाडी जात असल्याने मुंबईतील व कोकणातील या कष्टकरी प्रवाशांवर मध्यरेल्वेच्या या निर्णयामुळे अन्याय होत आहे
..
चौकट
कोणतेही कारण न देता खंडित..
बावीस वर्षे दादरपर्यंत जात असलेली पॅसेंजर रेल्वेगाडी कोणतेही कारण न देता दिवा स्थानकापर्यंतच खंडित केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. यात जातीने लक्ष घालून ही रेल्वेगाडी दादर स्थानकापर्यंत नेण्याचे आदेश कोकण रेल्वे व मध्यरेल्वेला द्यावेत, अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सचिन वहाळकर यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63380 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..