राजापूर ः 178 वर्गखोल्यांना गळतीची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः  178 वर्गखोल्यांना गळतीची शक्यता
राजापूर ः 178 वर्गखोल्यांना गळतीची शक्यता

राजापूर ः 178 वर्गखोल्यांना गळतीची शक्यता

sakal_logo
By

rat31p16.jpg
25565
राजापूर ः प्रिंदावण येथील शाळेची धोकादायक झालेली इमारत.
....
वर्गखोल्यांची दुरुस्ती नाहीच, लागणार गळती!

राजापूर तालुक्यातील ९४ शाळांच्या १७८ वर्गखोल्यांची स्थिती; निधी प्राप्त होण्याची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ ः नादुरुस्त आणि धोकादायक असलेल्या तालुक्यातील ९४ शाळांच्या तब्बल १७८ वर्गखोल्यांना दुरुस्तीची प्रतीक्षा राहिली आहे. त्यासाठी सुमारे २ कोटी ६७ लाख रूपये निधीची आवश्यकता आहे. काही इमारती कधीही कोसळुन दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यास या शाळांच्या इमारतींना पावसाळ्यामध्ये गळती लागणार आहे. त्यातून या शाळांमध्ये शिकणाऱ्‍या विद्यार्थ्यांना पावसाच्या ठिबकणाऱ्‍या पाण्याखाली बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहेत.
तालुक्यातील ९४ शाळांच्या तब्बल १७८ वर्गखोल्यांच्या इमारतींची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती होणे गरजेचे आहे. त्याचे प्रस्ताव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेकडे पाठवून निधीची मागणी केली आहे; मात्र, अद्यापही तालुक्याला निधी प्राप्त झालेला नाही. तालुक्यातील शाळा आणि नादुरुस्त वर्गखोल्यांची संख्या पुढीलप्रमाणे ः हातिवले नं. १ (४), उन्हाळे नं. १ (५), जुवाठी (४), कारवली नं. १ (३), तेरवण (४), वाडीखुर्द (३), गोवळ नं. ३ (४), नाणार पाळेकरवाडी (२), ससाळे नं. १ (२), सौंदळ नं. ३ (२), सौंदळ नं. २ (२), कुंभवडे नं. १ (४), खिणगिणी (१), रायपाटण नं. ४ (३), डोंगर नं. १ (३), मोरोशी नं. १ (२), नाणार इंगळवाडी (१), धोपेश्‍वर नं. १ (२), ओशिवळे नं. १ (३), पांगरे बुद्रुक नं. १ (२), फुफेरे नं. १ (४), उपळे नं. २ (१), शेढे नं. १ (३), तुळसुंदे (३), शिवणेबुद्रुक (१), सौंदळ उर्दू (२), कोंड्ये नं. ४ (१), उन्हाळे कणेरीवाडी (२), होळी (२), पाचल नं. २ (२), कशेळी नं. ४ (३), सोलगाव नं. १ (१), वाडाभराडे (३), पन्हळेतर्फ राजापूर (४), पाथर्डे (२), मंदरूळ नं. १ (२), वाटूळ नं. ४ (२), अणसुरे भराडेवाडे (१), वडदहसोळ नं. १ (१), खरवते नं. १ (१), दोनिवडे नं. १ (१), कोंढेतड नं. २(१), गोठणेदोनिवडे नं. २ (२), हसोळतर्फे सौंदळ नं. १ (2), तळगाव नं. १ (१), चुनाकोळवण नं. १ (3), कोदवली नं. १ (१), कोंडीवळे कासारवाडी (१), बारसू नं. १ (१), ओणी नं. २ (२), पन्हळेतर्फ सौंदळ नं. १ (३), कोंढेतड मराठी नं. १ (१), माडबन (२), गोखले कन्याशाळा राजापूर (२), कोंड्येतर्फ सौंदळ नं. ४ (१), ताम्हाणे नं. ५ (१), भालावली नं. २ (२), रूंढे (१), ओशिवळे नं. २ (४), साखर नं. १ (२), कोतापूर नं. २ (१), पन्हळेतर्फ सौंदळ नं. ३ (१), कळसवली नं. ३ (१), देवीहसोळ नं. २ (२), गोठणेदोनिवडे राघववाडी (२), बांदीवडे (१), ओणी नं. ५ (१), हातिवले नं. २ (१), शेंबवणे नं. २ (१), गोठणेदोनिवडे नं. ६ (१), वडदहसोळ नं. ५ (१), गोवळ नं. १ (१), विलये नं. ३ (२), गोठणे दोनिवडे नं. १ (२), रायपाटण नं. ३ (२), धाऊलवल्ली नं. २ (१), केळवली नं. ३ (2), तुळसवडे नं. १ (१), खरवते नं. ४ (2), मोसम नं. १ (1), कोंडीवळे गोतावडेवाडी (१), चुनाकोळवण निवखोल (१), अणसुरे वाकी (२), आडवली नं. ३ (२), सागवे घोडेपोई (१), जैतापूर आगार (१), दळे नं. २ (१), देवाचेगोठणे सोडयेवाडी (२), खरवते नं. ३ (२), विल्ये नं. ४ (१), देवीहसोळ नं. ३ (१), वडदहसोळ नं. ६ (२), आडवली नं. ३ (१), चिखलगाव वरची जड्यारवाडी (२).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63383 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top