सं पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सं पट्टा
सं पट्टा

सं पट्टा

sakal_logo
By

भवानी देवीचा
गोंधळ उत्साहात
मालवण ः ऐक्याचे प्रतीक असलेल्या ओरोस येथील श्री देवी भवानी देवीचा त्रैवार्षिक महागोंधळ उत्सव २७ मेस ओरोस व परिसरातील ज्ञातीबांधव, नाभिक बंधू यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धार्मिकतेचे जतन करणार्‍या या नाभिक बांधवांच्या गोंधळ उत्सवाला विविध विधींनी सुरुवात झाली. गोंधळाची पहाटे सांगता झाली. नाभिक समाजाचे राज्य संघटक विजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, अरुण चव्हाण, सुधीर चव्हाण, शेखर चव्हाण, शैलेंद्र अणावकर, आनंद चव्हाण, आनंद आचरेकर आदी पदाधिकार्‍यांसह सर्व मान्यवर व नाभिक ज्ञाती बांधव उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक समाजाचे चव्हाण, शैलेंद्र अणावकर, आनंद चव्हाण, आनंद आचरेकर आदी पदाधिकार्‍यांसह सर्व मान्यवर व नाभिक ज्ञाती बांधव उपस्थित होते.
--------------------
सावंतवाडीत ४ला
ज्येष्ठांची बैठक
सावंतवाडी ः तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा ४ जूनला सकाळी साडेदहा वाजता ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र , सालईवाडा, सावंतवाडी येथे आयोजित केली आहे. यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजेंद्र पाटील यांचे ''आहाराचे महत्त्व'' या विषयावर व्याख्यान होणार आहे, तरी सर्व सभासद - बंधु भगीनिंनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
माजी विद्यार्थ्यांचा
मेळावा उत्साहात
मालवण ः मालवण तालुक्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे या हायस्कूलच्या १९७१-१९७२ च्या ११ वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ५० वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा घेतला. यावेळी ५० वर्षांपूर्वी ११ वीत असताना ज्या वर्गात बसायचे त्याच वर्गात बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
---
नित्यानंद चिंदरकर
यांची निवड
कणकवली ः तालुक्यातील हरकुळ बुद्रुक सोसायटीच्या अध्यक्षपदी आनंद उफ बंडू ठाकूर व उपाध्यक्षपदी नित्यानंद चिंदरकर यांची गुरुवारी निवड करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63385 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top