नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना दिली तंबाखू सेवनविरोधी शपथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना दिली तंबाखू सेवनविरोधी शपथ
नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना दिली तंबाखू सेवनविरोधी शपथ

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना दिली तंबाखू सेवनविरोधी शपथ

sakal_logo
By

rat3135.jpg -
25637
रत्नागिरीः जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना दिली तंबाखू सेवनविरोधी शपथ
शासकिय रुग्णालयातर्फे प्रभातफेरीचे आयोजन; दुष्परिणामांची दिली माहिती
रत्नागिरी, ता. १ः जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक तंबाखू विरोधी दिन कार्यक्रम साजरा झाला. या वेळी सर्वांना तंबाखू सेवनविरोधी शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे, जिल्हा सल्लागार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम डॉ. शैलेश गावंडे, एनसीडी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव कांबळे, दंतशल्य चिकित्सक डॉ. शुभदा बडवे, डेन्टल टेक्निशियन संतोष राठोड, समुपदेशक प्राची भोसले, सामाजिक कार्यकर्ता सचिन भरणे, श्वेता चव्हाण, रामेश्वर म्हेत्रे, राम चिंचोळे, निशिकांत गिरी, प्रमोद शाक्य, प्राजक्ता जाक्कर, परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या दुधवडकर व त्यांच्या नर्सिंग विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी या वेळी तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखू सोडण्याबद्दल सर्व उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे यांनी व्यसनाधीन रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय ओपीडी क्र. ९ येथे समुपदेशन केंद्र असून, रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले. या दिनानिमित्ताने समाजामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती व्हावी या हेतूने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभातफेरीमध्ये नर्सिंग विद्यालय जिल्हा रुग्णालय येथील विद्यार्थी व शिक्षक, त्याचप्रमाणे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय किशोरस्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम यांनी सहभाग घेतला. तसेच जिल्हा शासकिय रुग्णालय, रत्नागिरी येथे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली. या वेळी नर्सिंग विद्यार्थी यांनी तंबाखू विरोधी पथनाट्य सादरीकरण केले व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेत विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व बॅग, पेन देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63407 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top