राजापूर ः साथींचा संभाव्य फैलाव रोखण्यास सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः साथींचा संभाव्य फैलाव रोखण्यास सज्ज
राजापूर ः साथींचा संभाव्य फैलाव रोखण्यास सज्ज

राजापूर ः साथींचा संभाव्य फैलाव रोखण्यास सज्ज

sakal_logo
By

साथींचा संभाव्य फैलाव रोखण्यास सज्ज

नऊ आरोग्य केंद्रामध्ये साथरोग पथकाची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ ः कोरोना महामारी रोखण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा आरोग्य विभाग पावसाळ्यामध्ये गढूळ पाण्यामुळे उद्भवणाऱ्‍या मलेरियासह अन्य साथींचा संभाव्य फैलाव रोखण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यासाठी तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साथरोग पथकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
पावसाच्या गढूळ पाण्यासोबत अन्य स्थितीमुळे विविध साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव आणि फैलाव होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार झालेले असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध साथींच्या रोगांचा फैलाव होतो. यामध्ये मलेरियासारख्या रोगाच्या साथीसह तापसरीच्या साथीचाही त्यामध्ये समावेश असतो. या साऱ्‍या साथींचा फैलाव न होता त्यांना वेळीच आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. यासाठी तालुक्यातील ओणी, करक, फुपेरे, केळवली, सोलगाव, जैतापूर, जवळेथर, धारतळे, कुंभवडे या नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकार्‍याच्या मार्गदर्शनाखाली साथरोग पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्‍यासह आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक-सेविका आदींचा समावेश आहे. या साथरोग पथकामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरातील गावांना वेळोवेळी भेटी देऊन तेथील रुग्ण आणि परिसराचे सर्व्हेक्षण करून पाहणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणाला कुठल्या साथीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्यास त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. त्यातच, प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावातील पाण्याचे नमूने वेळोवेळी तपासणीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63457 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top