
कणकवलीत वीजबिल वसुली आढावा
कणकवलीत वीजबिल वसुली आढावा
कणकवली ः महावितरणकडून थंकित वीजबिल वसुलीवर जोरदार लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. थकित ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वीजबिल वसुलीच्या अनुषंगाने रत्नागिरी येथील मुख्य अभियंता विजय भटकर यांनी कणकवली येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात सोमवारी आढावा घेतला. या बैठकीला कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी या विभागातील बीजबिल वसुलीचा प्रत्येक सेक्शननिहाय आढावा घेण्यात आला. महावितरणने घरगुतीसह व्यावसायिक, स्ट्रीटलाईट, नळयोजना आदीच्या थकित वीजबिल वसुलीसाठी सक्त सूचना दिलेल्या आहेत. बिल वसूल होत नसल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या असून त्यानुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत कारणे न सांगता वीजबिल वसुली करा. वसूल न होणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.
------------
गौरी तेली यांची निवड
कणकवली ः अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया विभागाच्या सरचिटणीसपदी सिंधुदुर्गमधून गौरी तेली यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
------------
सावंतवाडीत डासांचा प्रादुर्भाव
सावंतवाडी ः पूर्वमोसमी पाऊस, उघडी गटारे आणि जागोजागी प्लास्टिक पिशव्यांचा पडलेल्या खचांमुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. नगरपंचायतीने डास प्रतिबंधात्मक औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63505 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..