३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३

sakal_logo
By

दुचाकी धडकेत पादचारी ठार

साडवली बस थांब्याजवळील घटना; चालकावर गुन्हा

देवरुख, ता. ३१ः देवरुख - संगमेश्वर मार्गावरील साडवली बस थांबा येथे दुचाकीस्वाराने पादचाऱ्‍याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचारी ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार याबाबतची फिर्याद अजय दत्ताराम नवेले (रा. लोवले) यांनी दिली आहे. दत्ताराम जाणू नवेले (रा. लोवले) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. दत्ताराम नवेले हे कामानिमित्त सोमवारी साडवली येथे आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साडवली बस थांबा येथे एसटीची वाट पाहत असताना दुचाकीस्वाराने दत्ताराम नवेले यांना धडक दिली. नवेल यांना गंभीर दुखापत होऊन यामध्ये मयत झाले आहेत. रणजीत रमेश शिंदे (रा. कोसूंब) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकी चालक रणजित शिंदे याच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम व मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार डी. एस. पवार करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63553 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top