
‘डिजिटल इंडिया’ स्वप्नपूर्ती
25736
सिंधुदुर्गनगरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सुसंवाद कार्यक्रमात बोलताना खासदार मनोज कोटक. सोबत राजन तेली, अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, अमोल फाटक.
25737
सिंधुदुर्गनगरी : सुसंवाद कार्यक्रमाला उपस्थित लाभार्थी व अन्य.
‘डिजिटल इंडिया’ स्वप्नपूर्ती
मनोज कोटक ः मोदींच्या संवादाचे किर्लोस कृषी विज्ञान केंद्रात थेट प्रक्षेपण
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः निर्भय भारत बनविण्याचे मोदींचे स्वप्न पूर्ण करूया. डिजिटल इंडिया स्वप्न पूर्ण करून बदलत्या काळामध्ये भारत मागे राहू नये, अशा पद्धतीने मोदी सरकार काम करत आहे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुसंवाद कार्यक्रमात किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आयोजित थेट प्रक्षेपणावेळी केले.
केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री मोदी यांचा विविध शासकीय योजनेचे लाभार्थी व शेतकऱ्यांशी सुसंवाद कार्यक्रम व गरीब कल्याण संमेलन हिमाचल प्रदेश सिमला येथे काल (ता.३१) साजरा झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र किर्लोसद्वारे येथील कृषी महाविद्यालयात आयोजित केले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार कोटक उपस्थित होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कसाल शिक्षण संस्थेचे संचालक प्रभाकर सावंत, तहसीलदार अमोल फाटक, कृषी प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी श्री. तेली यांनी मार्गदर्शन केले. शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळण्यासाठी आम्ही काम करत आहोत असे ते म्हणाले. दरम्यान, केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे, शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत, विकास धामापूरक, डॉ. केशव देसाई, विवेक सावंत भोसले, सुमेधा तावडे, मंगेश पालव, नरेंद्र सावंत, अरुण पालव, प्राचार्य, उपप्राचार्य भावना पाताडे आदी उपस्थित होते. लाभार्थी शेतकरी संतोष सावंत, देवेंद्र घाडीगावकर, दिया जाधव, स्वप्नील गावडे यांनी विविध योजनांचे लाभार्थी म्हणून होणारे फायदे सभागृहात स्पष्ट केले. बाळकृष्ण गावडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विलास सावंत यांनी सूत्रसंचालन केले. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ विकास धामापूरकर यांनी आभार मानले.
--
योजनांबाबत लाभार्थ्यांशी चर्चा
खासदार कोटक यांनी केंद्राच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी चर्चा केली. त्यांनी उपस्थित लाभार्थ्यांशी चर्चा करून विविध योजनांची माहिती घेतली. मानव निर्मित अडचणींवर मात करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने ऑनलाईन काम करणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63590 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..