''प्रेरणा सम्यक समतेची'' विशेषांकाचे रविवारी प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''प्रेरणा सम्यक समतेची''
विशेषांकाचे रविवारी प्रकाशन
''प्रेरणा सम्यक समतेची'' विशेषांकाचे रविवारी प्रकाशन

''प्रेरणा सम्यक समतेची'' विशेषांकाचे रविवारी प्रकाशन

sakal_logo
By

‘प्रेरणा सम्यक समतेची’
विशेषांकाचे ५ ला प्रकाशन

सावंतवाडी, ता. १ ः येथील समता प्रेरणा भूमी संवर्धन समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९३२ च्या ऐतिहासिक सावंतवाडी भेटीचे प्रेरणाभूमीत रुपांतर करून जनमानसांत सामाजिक, धार्मिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी प्रथमच तयार केलेल्या ‘प्रेरणा सम्यक समतेची’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन रविवारी (ता. ५) होणार आहे.
नवसरणी सभागृहात सकाळी साडेदहाला प्रकाशन सोहळा व प्रबोधन जागर असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे. गौरव विशेषांकाचे प्रकाशन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, फादर अॅलेक्स डिमेलो विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रभाकर जाधव, चंद्रकांत जाधव, डॉ. प्रा. उल्हास चांदेलकर, सुजित जाधव, संजय कदम, सुरेश जाधव, शामसुंदर जाधव, डी. डी. कदम, भास्कर जाधव, राजेंद्र कदम, वाय. जी. कदम, भावना कदम यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात प्रकाशन सोहळा व दुपारी प्रबोधन जागर असा कार्यक्रम निश्चित केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपक पडेलकर असून, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन निमंत्रक तथा समता प्रेरणा भूमी संवर्धन समितीचे सचिव मोहन जाधव यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63593 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top