शेतकरी यशस्वी उद्योजक होणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी यशस्वी उद्योजक होणे गरजेचे
शेतकरी यशस्वी उद्योजक होणे गरजेचे

शेतकरी यशस्वी उद्योजक होणे गरजेचे

sakal_logo
By

(लाल मातीतील शिवार.............लोगो)

rat१p३.jpg ः
L२५७५३
डॉ. वैभव शिंदे


इन्ट्रो-
----
कोकणात शेती किफायतशीर नाही म्हणून भात आणि नाचणी याच्या लागवडीखालील क्षेत्र कमी होत चालले आहे. कोविड काळ याला अपवाद. चाकरमानी दीर्घकाळ घरी परतले आणि शेतात राबणारे हात वाढले. या परिणामी काही अंशाने भातशेतीखालील जमीन वाढली; मात्र हे चित्र कायमस्वरूपी राहणे शक्य नाही. यात शेतीतील त्रुटी आणि स्थानिकांची मानसिकता हे दोन्ही घटक आहेत. याची चर्चा करत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या जमिनीत शेती ही केलीच पाहिजे; मात्र ती करताना दृष्टिकोन बदलायला हवा. येथील शेतकरी उद्योजक व्हायला हवा. तो कसा होईल आणि स्मार्ट शेती कशी बनेल? याचा ऊहापोह करणाऱ्या मालिकेतील हा पहिला लेख .......
- डॉ. वैभवकुमार वि. शिंदे
------------

शेतकरी यशस्वी उद्योजक होणे गरजेचे

आज कोकणची भूमी ही सुमारे २९ लाख हेक्टर असली तरी पिकनिहाय त्याची विभागणी केली तर सुमारे ५ लाख हेक्टर क्षेत्रावर बागायती पिके व ४.५ लाख हेक्टर क्षेत्रावर भात व इतर तृणधान्य पिके घेतली जातात. यात लागवडीलायक सुमारे १० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र पडीकच आहे. यामागील कारणे अनेक आहेत. भविष्यात ही मोठी क्षेत्रे लागवडीखाली विशेषतः कोरडवाहू पिकाखाली येतील. कालांतराने ती आणली जातील. कोकणच्या विकासासाठी पडीक जमिन विकासाचा कार्यक्रम राबवल्याशिवाय पर्याय नाही. कोकणातील शेतीला आणि शेतीबरोबरच पर्यटन व्यवसायाला महत्व प्राप्त झाले आहे. बहुतांशी मुंबईकर आणि परप्रांतातील लाकांनी भविष्यातील कोकणचे महत्व ओळखून येथील जमिनी मोठ्या प्रमाणात हस्तगत केल्या आहेत. अशा नव्याने जमिनी खरेदी करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंबा, काजू, नारळ व रबर इत्यादी पिकांची व इतर ठिकाणी पालघर भाजीपाला, सिंधुदुर्ग ऊस, सावंतवाडी केळी इत्यादीची लागवड केलेली आहे. स्थानिक शेतकऱ्यांची शेती ही छोट्या छोट्या भागामध्ये विखुरलेली आहे. ही एक समस्या आहेच; परंतु त्याचबरोबर हेही समजून घेणे आवश्यक आहे की, आज शेती करत असलेला शेतकरी हा एक यशस्वी उद्योजक होण्यास असमर्थ का ठरत आहे? याची कारणे शोधताना खालील बाबींवर विचारविनिमय करणे आवश्यक वाटते.
कोकणातील भूप्रदेश हा डोंगराळ असून, शेती ही छोट्या छोट्या भागामध्ये विखुरलेली असल्यामुळे वैयक्तिक शेतकऱ्याला यांत्रिकीकरण, सिंचन इ. बाबींवर मर्यादा येतात व उत्पादन खर्च वाढतो. याशिवाय कोकणात शेतीशिवाय इतर व्यवसायातून अर्थार्जन पैसा उपलब्ध करणे सहज शक्य असल्यामुळे शेती हा प्राधान्याने करण्याचा व्यवसाय नाही. शेतीकडे वळण्याचा तरुणाचा कल अतिशय कमी, मुंबई शहराकडे धाव घेण्याची प्रबळ इच्छा. जेथे पाण्याची सोय आहे तिथे होतकरू शेतकरी नाही, जेथे हाडाचा शेतकरी आहे तिथे पाणी आणि जमिन नाही आणि जिथे दोन्ही बाबी समर्थपणे आहेत तेथे तंत्रज्ञानाचा अभाव, आगीचे भय, जंगली प्राण्यांचा उपद्रव, मजुरांचा अपुरा पुरवठा या अडचणी आहेत. या बाबी जरी सत्य असल्या तरी कृषी विद्यापिठे, निरनिराळ्या संशोधन संस्था, होतकरू आणि समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे शेतकरी जीवनात एक आशादायी बदल घडत आहे. यामध्ये स्मार्ट शेती संकल्पना महत्वाची आहे. त्यातून निश्‍चित कोकणातील शेतीत आमुलाग्र बदल होऊन एक आदर्श स्मार्ट शेती निर्माण होऊ शकेल.
स्मार्ट शेतीतून समाज आणि आर्थिक सुधारणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान आणि कौतुकसुद्धा झाले पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्याचबरोबर वेळोवेळी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्याला तांत्रिक व आर्थिक बळही दिले पाहिजे तर आणि तरच स्मार्ट शेती घडायला वेळ लागणार नाही.

(लेखक प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, रत्नागिरी येथे कृषिविद्यावेत्ता आहेत.)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63612 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top