मळेवाड सोसायटीवर शिवसेनेचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळेवाड सोसायटीवर 
शिवसेनेचे वर्चस्व
मळेवाड सोसायटीवर शिवसेनेचे वर्चस्व

मळेवाड सोसायटीवर शिवसेनेचे वर्चस्व

sakal_logo
By

मळेवाड सोसायटीवर
शिवसेनेचे वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः मळेवाड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. शिवसेना विरुध्द भाजप अशा चुरशीच्या झालेल्या निवडणूक प्रक्रियेत अखेर शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उमेदवार सात विरुद्ध पाच मतांनी विजयी झाले. यावेळी शिवसेनेच्यावतीने एकच जल्लोष करण्यात आला.

शिवसेना पुरस्कृत गाव पॅनल मळेवाड-कोंडुरेमधून चेअरमन पदासाठी प्रकाश पार्सेकर व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रकाश राऊत यांनी अर्ज दाखल केला होता; तर भाजप पुरस्कृत पॅनलमधून दत्ताराम नाईक व विठ्ठल मोरुडकर यांनी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या विजयानंतर चेअरमनपदी पार्सेकर, तर व्हाईस चेअरमनपदी राऊत यांची निवड करण्यात आली. विजयी संचालक सीताराम शिरसाट, रवींद्र तळवणेकर, अर्जुन तेली, धाकू शेळके, गोपिका रेडकर, मधुकर जाधव, दत्ताराम नाईक, जनार्दन नाईक, विठ्ठल मोरुडकर, प्रविणा आपटे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद माजी सदस्य राजन मुळीक, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, सोसायटी सचिव भाविका काळोजी, प्रविणा आपटे, राजन नाईक, सीताराम शिरसाट, नाना मुळीक, मुन्ना मुळीक, नंदू नाईक, बाबल मुळीक, श्रीकांत नाईक, सतीश सातार्डेकर, बाळा रेडकर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदिनी माळगावकर यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63659 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top